By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 14:11 IST
1 / 9उन्हाळ्यात एसी नसेल तर काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही पंख्याची हवा थंड करू शकता. त्यासाठी काही टिप्स नक्की वापरा. (5 Smart Ways To Make Your Ceiling Fan Blow Ice Cold Air)2 / 9पंख्याच्या समोर किंवा मागे एका भांड्यात बर्फाचे खडे ठेवा. पंख्याची हवा या बर्फाला लागून तुमच्यापर्यंत थंडगार हवा पोहोचेल. (How To Make Ceiling Fan Give Cold Air)3 / 9 पंख्याच्या जाळीवर किंवा समोर एखादा ओला सुती पडदा किंवा टॉवेल लटवून ठेवा. बाष्पीभवनामुळे खोलीतील तापमान लगेच कमी होते.4 / 9 संध्याकाळी खिडक्या उघड्या ठेवा आणि पंखा अशा ठिकाणी लावा ज्यामुळे बाहेरची हवा आत येईल आणि आतील गरम हवा बाहेर फेकली जाईल.5 / 9टेबल फॅनच्यासमोर दोन प्लास्टीकच्या बाटल्यांमध्ये मीठ मिसळलेले पाणी गोठवून ठेवा. यामुळे बराचवेळ थंड हवा मिळते.6 / 9 दुपारच्यावेळी घरातील गरम हवा बाहेर काढण्यासाठी किचनमधील एक्झॉस्ट फॅन सुरू ठेवा. जेणेकरून खोलीत गुदमरल्यासारखं होणार नाही.7 / 9पंख्याच्या खाली किंवा समोर पाण्याचे पसरट भांडे किंवा कुंडी ठेवा. यामुळे हवेत ओलावा टिकून राहील.8 / 9पंख्याच्या पात्यांवर धूळ साचल्यास त्याचा वेग कमी होतो आणि हवा गरम लागते. त्यामुळे उन्हाळ्यात नियमित पंखा स्वच्छ ठेवा.9 / 9रात्री खिडकीजवळ पंखा ठेवल्यास बाहेरची थंड हवा वेगानं आत येते आणि झोप चांगली लागते.