Join us

उकडत असल्याने स्वयंपाक करणंही नकोसं होतं? डिनरसाठी करा झटपट होणारे ६ पदार्थ- वेळ वाचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2025 09:25 IST

1 / 7
उन्हाळ्याच्या दिवसात स्वयंपाक करणं हे मोठं कठीण काम होऊन बसतं. कारण आधीच खूप उष्णता असते. आणि त्यात पुन्हा स्वयंपाक करताना शेगडीमुळे सगळं स्वयंपाक घरच गरम होऊन जातं.
2 / 7
त्यामुळे किचन ओट्याजवळ जायलाही अगदी नकोसं होतं. त्यात सकाळचा स्वयंपाक सगळा करावाच लागतो. पण रात्री कित्येकांना खूप हेवी जेवण नको असतं. त्यातही उन्हाळ्यामुळे रात्री काहीतरी हलकंफुलकं खाण्याची इच्छा होते. अशावेळी कमीतकमी वेळ गॅसजवळ उभं राहून कोणकोणते पदार्थ अगदी झटपट करता येऊ शकतात ते पाहूया..
3 / 7
सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे खिचडी. खिचडी अगदी झटपट करता येते. शिवाय पचायलाही हलकी असते त्यामुळे अनेकांना रात्रीच्या जेवणात खिचडी आवडते.
4 / 7
साधी खिचडी आवडत नसेल तर पुलाव किंवा मसालेभात अशा पदार्थांचाही तुम्ही विचार करू शकता. यासाठी भाज्या चिरणे, लसूण सोलणे अशी कामं तुम्ही पंख्याखाली बसून आरामात करू शकता. जेणेकरून जास्तीतजास्त वेळ गॅसजवळ उभं राहण्याची गरज नाही.
5 / 7
मिसळपाव हा देखील एक चांगला पर्याय आहे. पावभाजीसारखं पाव भाजत बसण्याची गरज नाही. त्यामुळे झटपट होतं.
6 / 7
इडली सांबारही रात्रीच्या जेवणासाठी करू शकता. सांभारसाठी लागणाऱ्या भाज्या चिरण्याचे काम पंख्याखाली बसून करता येऊ शकते. त्यामुळे गॅसजवळ उभे राहण्याचा वेळ आपोआपच वाचतो.
7 / 7
भाज्या किसून केलेले पराठे किंवा कांद्याचे थालिपीठ असा मेन्यूही अगदी झटपट होऊ शकतो.
टॅग्स : सोशल व्हायरलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससमर स्पेशल