By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 23:22 IST
1 / 11जागतिक महिला दिनानिमित्त (Women's Day 2026) स्वत:ला एक क्लासी आणि रॉयल लूक द्यायचा असेल तर चिकनकारी कुर्ता हा उत्तम पर्याय आहे. लखनऊची पारंपारीक कला आजही फॅशनच्या जगात अव्वल स्थानावर आहे. (Dresses For Women's Day)2 / 11जर तुम्हाला इंडो वेस्टर्न लूक हवा असेल तर चिकनकारी पेपलम कुर्ता जीन्स किंवा धोती पँटसोबत अप्रतिम दिसतो.3 / 11सणासुधीच्या किंवा विशेष कार्यक्रमांच्या फिलसाठी फ्लोअर लेन्थ अनारकली चिकनकारी कुर्ता निवडा. जो तुम्हाला एक राणीसारखा लूक देईल.4 / 11ऑफिस किंवा फॉर्मल मीटिंगसाठी पांढऱ्या किंवा पेस्टल रंगाचा स्ट्रेट कट कुर्ता किंवा प्लाझो हा सर्वात सोबत पर्याय आहे.5 / 11सध्या चिकनकारीसोबत बारीक आरश्यांचे काम असलेले कुर्ते खूपच ट्रेंडमध्ये आहेत. जे रात्रीच्या कार्यक्रमांसाठी योग्य ठरतात.6 / 11 उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना जॉर्जेट, कॉटन किंवा मलमल फॅब्रिककमधील चिकनकारी कुर्ते निवडणं आरामदायी आणि स्टायलिश ठरेल.7 / 11महिला दिनाचे औचित्य साधून जांभळा, गुलाबी आणि पांढरा अशा प्रसन्न रंगांना पसंती द्या.8 / 11यात तुम्हाला डार्क लाईट अशा बऱ्याच रंगसंगतीचे कपडे पाहायला मिळतील.9 / 11 यावर तुम्ही जीन्स किंवा प्लाझो, लेगिन्ज तुमच्या आवडीनुसार काहीही मॅच करून घालू शकता.10 / 11चिकनकारी कुर्ता हा फक्त उन्हाळ्यातच नाही तर त्याच्या सॉफ्ट फॅब्रिकमुळे कोणत्याही ऋतूत घालता येईल असा आहे.11 / 11या टाईपचे कुर्ता सेट्ससुद्धा सध्या बरेच व्हायरल होत आहेत जे तुम्ही पूजा, लग्नकार्य अशा अनेक प्रसंगांना घालू शकता.