By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 18:36 IST
1 / 10प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2026) पांढऱ्या साडीवर फक्त पांढरं ब्लाऊज न घालता तुम्ही काही कलरफुल पर्यायचांचा विचार करून तुमचा लूक अधिक उठावदार बनवू शकता. (White Saree For Republic Day)2 / 10 जर तुमची साडी साधी असेल तर त्यावर कलमकारी प्रिंट किंवा राजस्थानी बांधणीचे रंगेबीरंगी ब्लाऊज ट्राय करा. यामुळे तुम्हाला १ इंडो वेस्टर्न लूक येईल. (White Saree With Colourful Blouse For Republic Day)3 / 10निळ्या रंगाचे किंवा मल्टीकलर मिरर वर्क निळ्या रंगाचे किंवा मल्टीकलर मिरर वर्क असलेले ब्लाऊज पांढऱ्या साडीवर उठून दिसतात.4 / 10 या दिवशी तु्म्ही चंदेरी सिल्क, कोरा कॉटन, किंवा लिननची पांढरी साडी निवडू शकता. काठाल जर सोनेरी किंवा तिरंगा बॉर्डर असेल तर ती अधिक शोभून दिसते.5 / 10या लूकवर ऑक्सिडाईज दागिने किंवा तिरंगा रंगाच्या बांगड्या घालून तुम्ही तुमचा पेहराव पूर्ण करू शकता.6 / 10ब्लाऊजवर कोल्हापूरी किंवा कच्छी वर्कचे रंगेबिरंगी जॅकेट घातल्यास एक हटके आणि पॉवरफुल लूक तयार होतो.7 / 10 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पांढऱ्या साडीवर भडक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचे खादी सिल्क ब्लाऊज वापरल्यानं पेहरावात साधेपणा आणि तेज दोन्ही येते.8 / 10जर तुमची साडी प्लेन पांढरी असेल तर त्यावर कलरफुल फुलांची डिझाईन्स असलेले ब्लाऊज फ्रेश आणि मॉडर्न लूक देईल.9 / 10तुम्हाला साधा पण आकर्षक लूक हवा असेल तर तुम्ही खादी कॉटनची साडी आणि प्रिंटेड ब्लाऊज निवडू शकता. 10 / 10लाल रंगाचे वर्क असलेले ब्लाऊज ऑफ व्हाईट साडीवर घातल्यास तुमचा लूक खुलून येईल.