घागरा घ्यायचाय? पाहा पैठणी ते हेवी वर्क- घागऱ्याचे एकसेएक खिशाला परवडतील असे डिझायनर पर्याय

Published:April 25, 2022 03:48 PM2022-04-25T15:48:28+5:302022-04-25T16:40:25+5:30

घागरा खरेदी करायचा असेल तर त्याचे पॅटर्न्स आणि किंमती माहित असायला हव्यात, पाहूयात घागऱ्याचे एक से एक पॅटर्न्स

घागरा घ्यायचाय? पाहा पैठणी ते हेवी वर्क- घागऱ्याचे एकसेएक खिशाला परवडतील असे डिझायनर पर्याय

लग्नसराई सुरू झाली की आपण सगळेच शॉपिंगला सुरुवात करतो. कधी आपल्या स्वत:चे तर कधी आपल्या बहिण-भावंडांचे आणि मित्रमंडळींचे लग्न असते. समारंभ म्हटल्यावर पारंपरिक कपडे तर हवेतच. यामध्ये सहावारी साडी, नऊवारी साडी हे काहीसे मागे पडत असून सध्या लेहंगा किंवा घागरा हे ट्रेंडिंग आहे.

घागरा घ्यायचाय? पाहा पैठणी ते हेवी वर्क- घागऱ्याचे एकसेएक खिशाला परवडतील असे डिझायनर पर्याय

साड्यांमध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात त्याचप्रमाणे घागऱ्यामध्येही बरेच पॅटर्न असतात. सध्या बहुतांश अभिनेत्रीही आपल्या लग्नासाठी लेहंगा घालून लग्नाचा खास क्षण सेलिब्रेट करताना दिसतात.

घागरा घ्यायचाय? पाहा पैठणी ते हेवी वर्क- घागऱ्याचे एकसेएक खिशाला परवडतील असे डिझायनर पर्याय

घागऱ्याची निवड करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. कधी तयार घागरे घेतले जातात तर कधी सेमी स्टीच घागरे मिळतात. हे घेताना काय काळजी घ्यायची आणि घागऱ्यांचे वेगवेगळे पॅटर्नस याविषयी माहिती घेऊया.

घागरा घ्यायचाय? पाहा पैठणी ते हेवी वर्क- घागऱ्याचे एकसेएक खिशाला परवडतील असे डिझायनर पर्याय

घागऱ्यामध्ये साधारण पेस्टल रंगांना जास्त पसंती असल्याचे दिसते. यामध्ये बेबी पिंक, पिस्ता, लेमन यलो, आकाशी अशा रंगाचे घागरे जास्त घातले जातात. मात्र स्वत:चेच लग्न असेल तर थोडे हेवी, वर्क असलेले घागरा घातला जातो. यामध्ये आपण घेऊ त्या रेंजमधले म्हणजे अगदी १ हाजारापासून ५० हजारांपर्यंतचे घागरे घेता येतात.

घागरा घ्यायचाय? पाहा पैठणी ते हेवी वर्क- घागऱ्याचे एकसेएक खिशाला परवडतील असे डिझायनर पर्याय

घागऱ्याचे घेर आणि त्याचे ब्लाऊज यामध्ये वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात. आपली उंची, शरीरयष्टी आणि आवड लक्षात घेऊन आपण आपल्याला हवा तसा डिझायनर ब्लाऊज आपण निवडू शकतो. यामध्ये नेक आणि बाह्या यांचे हटके पॅटर्न्स असतात.

घागरा घ्यायचाय? पाहा पैठणी ते हेवी वर्क- घागऱ्याचे एकसेएक खिशाला परवडतील असे डिझायनर पर्याय

सध्या पैठणी घागऱ्याचीही बरीच क्रेझ असून अशाप्रकारचा घागरा आपण आपल्या मापाने शिवून घेऊ शकतो. साडीचा किंवा पैठणी कापडाचा हा घागरा घालायला सुटसुटीत आणि तरीही पैठणीचा लूक देणारा असतो. रीयल पैठणीची किंमत जास्त असल्याने या घागऱ्याची किंमतही साधारणपणे ८ ते १० हजारांच्या पुढे असते.

घागरा घ्यायचाय? पाहा पैठणी ते हेवी वर्क- घागऱ्याचे एकसेएक खिशाला परवडतील असे डिझायनर पर्याय

घागऱ्याचे कापड नेटचे किंवा वेगळ्या प्रकारचे असल्याने यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रिल किंवा घेर पाहायला मिळतात. तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळे आणि उठून दिसायचे असेल तर अशी फॅशन तुम्ही नक्की कॅरी करु शकता. याचे कापड नेटचे असल्याने याची सुरुवात २ हजारांपासून होते ते १० हजारांपर्यंत खरेदी करता येतात. या पॅटर्नला रफलही म्हटले जाते.

घागरा घ्यायचाय? पाहा पैठणी ते हेवी वर्क- घागऱ्याचे एकसेएक खिशाला परवडतील असे डिझायनर पर्याय

हेवी घागऱ्याबरोबरच सध्या फ्लोरल प्रिंट असलेल्या घागऱ्यालाही तरुणींची विशेष पसंती असल्याचे पाहायला मिळते. यामध्ये वेगवेगळे रंग आणि पॅटर्न उपलब्ध असून उन्हाळ्याच्या दिवसांत हे घागरे घालायला आणि कॅरी करायला सोपे जातात. याची किंमत अगदी १५०० पासून ७ ते ८ हजारापर्यंत असते.

घागरा घ्यायचाय? पाहा पैठणी ते हेवी वर्क- घागऱ्याचे एकसेएक खिशाला परवडतील असे डिझायनर पर्याय

जास्त वर्क असलेला हेवी घागरा नको असेल तर कमी वर्क असलेले किंवा कमी घेरदार, प्लेन तरीही सिंपल असे घागरेही बाजारात मिळतात. हे घागरे आपण एखाद्या लहान फक्शनला घालू शकतो. याची किंमत अगदी १ हजारापासून ते ६ ते ७ हजारापर्यंत असते. आपल्या आवडीनुसार कापड घेऊन आपण कॉम्बिनेशनही करु शकतो.