नव्या नवरीसाठी २ ते ५ ग्रॅमचे छोटे मंगळसूत्र; १० मॉडर्न डिझाईन्स, ऑफिस-सणवाराला उठून दिसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:04 IST
1 / 10नव्या नवरीसाठी सोन्याच्या लहान मंगळसूत्राचे डिझाईन्स सध्या खूपच लोकप्रिय होत आहेत. २०२६ च्या नवीन ट्रेंडनुसार काही खास डिझाईन्स तुमचा लूक खुलवतील. (Small Mangalsutra For New Bride Daily Use)2 / 10नवीन नवरीसाठी दैंनंदिन वापरासाठी २ ते ३ ग्रॅम वजनासाठी १६ ते १८ इंच लांबीचे मंगळसूत्र सर्वात सोयीचे ठरते. (Small Mangalsutra Designs For Women)3 / 10कमी वजनामुळे हे खिशाला परवडणारे असते. सोन्याचे दर पाहता बजेटमध्ये राहून एक स्टायलिश दागिना घेता येतो. (Light Weight Mangalsutra For Women)4 / 10 जरी वजन कमी असले तरी अधुनिक तंत्रज्ञानामुळे ही मंगळसूत्र दैनंदीन वापरासाठी पुरेशी मजबूत असतात आणि उठून दिसतात.5 / 10१६ ते १८ इंच लांबीचे मंगळसूत्र गळ्याच्या अगदी खाली राहते. हे डिझाईन्स साडी, कुर्ती किंवा अगदी ऑफिसच्या फॉर्मल शर्टवरही उठून दिसतात.6 / 10 मिनिमलिस्ट सॉलिटेअर डिझाईन्समध्ये काळ्या मण्यांच्या नाजूक साखळीत मध्यभागी एकच मोठा हिरा किंवा सोन्याचा गोल मणी असतो. हे डिझाईन्स ऑफिस वेअर आणि वेस्टर्न कपड्यांवर अत्यंत मोहक दिसतात.7 / 10प्रेमाचे प्रतिक म्हणून हॉर्ट शेपचे पेंडंट असलेलं मंगळसूत्र सध्या खूपच ट्रेंडींग आहे. अशी मंगळसूत्र नवरीची पहिली पसंती ठरत आहे.8 / 10कितीही स्टाईल बदलत राहिल्या तरी दोन वाट्यांच्या मंगळसूत्राची फॅशन काही जात नाही. २ वाट्यांचे मंगळसूत्र नेहमीच ट्रेंडींग असते.9 / 10पिवळ्या सोन्याऐवजी आता रोज गोल्ड मंगळसूत्रांना देखिल पसंती दिली जात आहे. जे विशेषत: तरूण महिलांमध्ये लोकप्रिय आहे.10 / 10 स्वत:चे किंवा पतीच्या नावाचे पहिले अक्षर सोन्यात गुंफलेले मंगळसूत्र ही सध्याची एक खास स्टाईल आहे.