राखीपौर्णिमेला बहिणीसाठी घ्या खास गिफ्ट, बघा एकसेएक बजेट आयडिया, सुंदर आणि प्यारवाली भेट

Published:August 3, 2022 03:06 PM2022-08-03T15:06:56+5:302022-08-03T15:12:52+5:30

राखीपौर्णिमेला बहिणीसाठी घ्या खास गिफ्ट, बघा एकसेएक बजेट आयडिया, सुंदर आणि प्यारवाली भेट

१. राखीपौर्णिमा, भाऊबीज असे सण म्हटले की बहिणींना सगळ्यात जास्त आकर्षण असतं ते भावाकडून मिळणाऱ्या खास गिफ्टचं.. त्यामुळेच तर बहिणीला दरवर्षी काय बरं वेगळं द्यावं असा प्रश्न भावाला पडतोच. जिला नणंद असते ती वहिनीदेखील नणंदेसाठी खास काहीतरी गिफ्ट (best gifts for sisters) शोधतच असते. म्हणूनच तर काय गिफ्ट द्यावं, हे समजत नसेल तर या काही गोष्टी तुम्हाला आवडतात का ते बघा...

राखीपौर्णिमेला बहिणीसाठी घ्या खास गिफ्ट, बघा एकसेएक बजेट आयडिया, सुंदर आणि प्यारवाली भेट

२. कोणत्याही वयातली मुलगी असो आणि तिच्या कपाटात कितीही ढिगभर कपडे असो. तिला ते कमीच पडतात. त्यामुळे बहिणीसाठी तुम्ही एखादा छानसा कुर्ता, टॉप, स्कर्ट, वनपीस, घागरा, लेहेंगा अशी खरेदी करू शकता. या प्रत्येक गोष्टीत असंख्य प्रकार बघायला मिळतात. फक्त कपडे घेताना ते आपल्या बहिणीला व्यवस्थित बसतील, याची खात्री करून घ्या. अगदी ५०० रुपयांपासून ते तुमच्या खिशाला परवडेपर्यंत वेगवेगळ्या किमतीत असे कपडे मिळतात.

राखीपौर्णिमेला बहिणीसाठी घ्या खास गिफ्ट, बघा एकसेएक बजेट आयडिया, सुंदर आणि प्यारवाली भेट

३. अगदी पर्सनल टच असणारं गिफ्ट द्यायचं असेल तर तुमचे भाऊ- बहिणींचे फोटो असणारे कप, फोटोफ्रेम, फ्रिजच्या दरवाजावर लावण्यात येणारे फोटोंचे मॅगनेट अशा गोष्टींचाही विचार करू शकता. अगदी १५०- २०० रुपयांतही अशा वस्तू मिळतात.

राखीपौर्णिमेला बहिणीसाठी घ्या खास गिफ्ट, बघा एकसेएक बजेट आयडिया, सुंदर आणि प्यारवाली भेट

४. बहिणीला मेकअपची आवड असेल तर सरळ मेकअप किट देऊन टाका. ब्रॅण्डेड मेकअप किट द्यायची तर बजेट थोडे वाढते. त्यामुळे मग आय मेकअप, लिप मेकअप, बेस मेकअप, हेअर मेकअप अशा वेगवेगळ्या मेकअप किट मिळतात. त्यात मर्यादित प्रोडक्ट्स असतात. उदाहरणार्थ जर आय मेकअप किट देणार असाल तर त्यात काजळ, आय लायनर, मस्कारा, आयशॅडो अशा गोष्टींचाच समावेश असतो. अशा मेकअप किट साधारण ५०० ते १५०० या रेंजमध्ये मिळतात.

राखीपौर्णिमेला बहिणीसाठी घ्या खास गिफ्ट, बघा एकसेएक बजेट आयडिया, सुंदर आणि प्यारवाली भेट

५. परफ्यूम हे देखील बहिणीसाठी एक खास गिफ्ट होऊ शकतं. कारण आजकाल परफ्यूम ही केवळ फॅशन नाही, तर गरज झाली आहे. ३०० रुपयांतही ब्रॅण्डेड परफ्यूमच्या मिनी बॉटल्स मिळू शकतात.

राखीपौर्णिमेला बहिणीसाठी घ्या खास गिफ्ट, बघा एकसेएक बजेट आयडिया, सुंदर आणि प्यारवाली भेट

६. बहीण जर नोकरी करणारी असेल तर तिला लॅपटॉप ठेवायला एखादी ट्रेण्डी- आकर्षक लॅपटॉप बॅग देऊ शकता. ५०० ते १००० या रेंजमध्ये हे गिफ्ट मिळू शकेल.

राखीपौर्णिमेला बहिणीसाठी घ्या खास गिफ्ट, बघा एकसेएक बजेट आयडिया, सुंदर आणि प्यारवाली भेट

७. बहिणीचं लग्न झालेलं असेल, तिला तिचं घर सजविण्याची आवड असेल तर होम डेकोर किंवा किचन डेकोर या प्रकारातलं एखादं गिफ्ट तिला आवडू शकतं.

राखीपौर्णिमेला बहिणीसाठी घ्या खास गिफ्ट, बघा एकसेएक बजेट आयडिया, सुंदर आणि प्यारवाली भेट

८. तसंच गार्डनिंगची आवड असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या तिला नक्कीच आवडू शकतात.

राखीपौर्णिमेला बहिणीसाठी घ्या खास गिफ्ट, बघा एकसेएक बजेट आयडिया, सुंदर आणि प्यारवाली भेट

९. बजेट थोडं जास्त असेल, तर या गिफ्टचा विचार करू शकता. बहिणीला फिरायची आवड असेल तर एखादा शनिवार- रविवार बघून तिच्यासाठी एक मस्त ट्रिप प्लॅन करा. ते तिच्यासाठी अगदी छान असं रिफ्रेशिंग गिफ्ट होऊ शकतं.

राखीपौर्णिमेला बहिणीसाठी घ्या खास गिफ्ट, बघा एकसेएक बजेट आयडिया, सुंदर आणि प्यारवाली भेट

१०. बहिणीची आवडनिवड समजतच नसेल आणि तिच्यासाठी एखादं गिफ्ट निवडणं खूपच कठीण जात असेल तर अशावेळी ऑनलाईन शॉपिंग साईटची मदत घेऊ शकता. राखीपौर्णिमा, भाऊबीज अशा सणांमध्ये ऑनलाईन शॉपिंग साईटवर गिफ्ट व्हाऊचर्स उपलब्ध असतात. तुमचं बजेट जेवढं असेल तेवढ्या किमतीचं ऑनलाईन शॉपिंग साईटचं गिफ्ट व्हाऊचर बहिणीला देऊन टाका आणि तिला तिच्या पसंतीने तिला हवी ती गोष्ट घेऊ द्या.