Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कमी ग्रॅम सोन्यात लांब मंगळसूत्र-मोठ्या पेंडंटचे २० ठसठशीत डिझाइन्स,गळ्यात शोभणारा दागिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:48 IST

1 / 9
लग्नसराईत मोठ्या मंगळसुत्रांना बरीच मागणी असते. सध्या सोन्याचे भाव कमी-जास्त होत असले तरीही भारतीय परंपरेत लग्न म्हटलं की सोन्याचे दागिने वधूसाठी आणि वरासाठीही घ्यावेच लागतात. (Long Gold Mangalsutra Latest Designs)
2 / 9
मंगळसूत्र हा सौभाग्याचा प्रतिक असलेला दागिना महिलांसाठी खूपच जवळचा आहे. लग्नसराईत मोठ्या मंगळसूत्रांच्या नवनवीन डिझाईन्सना बरीच मागणी असते. (Long Gold Mangalsutra In Less Gram)
3 / 9
मोठ्या मंगळसुत्रात तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतील. आजकाल कमी ग्रॅममध्ये हेवी डिझाईन्स बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे.
4 / 9
कमी ग्रॅममधल्या मंगळसुत्रात तुम्हाला काळेमणी आणि गोल्डन सरी यांचा सुंदर समतोल पाहायला मिळेल.
5 / 9
पेंडंट तुम्ही आपल्या आवडीनुसार निवडू शकता.सध्या मोठ्या पेडंटचा टेंड्र आहे. पान आकाराचे पेंडंट कमी प्रमाणात निवडले जातात.
6 / 9
काहीजणांना मंगळसुत्राच्या डिझाईनमध्ये काळे मणी खूप कमी हवे असतात अशावेळी तुम्ही या डिझाईनचं मंगळसूत्र बनवून घेऊ शकता.
7 / 9
जर तुम्हाला फार मोठं, बटबटीत मंगळसूत्र नको असेल तर तुम्ही ही सिंपल डिझाईन ट्राय करू शकता. या मंगळसुत्रातील वाट्या या साध्या तितक्याच आकर्षक आहेत.
8 / 9
तुम्हाला या मंगळसुत्रात तर वाट्याऐवजी इतर पेंडंट डिझाईन्स हव्या असतील तर तुम्ही त्यासुद्धा बनवून घेऊ शकता. यात दागिना वजनानं हलरा आणि आकारानं मोठा दिसतो.
9 / 9
ही मंगळसूत्र एकदम राजेशाही आणि एलिगंट लूक देतात. पोकळ मणी आणि लेझर कटींग तंत्रज्ञानाचा वापर करून कमी ग्रॅममध्ये हेवी डिझाईन्सची मंगळसूत्र बनवली जातात.
टॅग्स : सोनंफॅशनदागिनेशुभविवाह