By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 17:58 IST
1 / 10कलांजली पैठणी (Kalanjali Butta Paithani) आणि एम्ब्रॉयडरी ब्लाऊज यांमधील मिलाफ हा भारतीय पारंपारीक वस्त्रांमधील सौंदर्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. (Kalanjali Paithani With Aari Work Blouse)2 / 10कलांजली पैठणी ही तिच्या समृद्ध विणकामासाठी ओळखली जाते. जेव्हा या साडीसोबत एम्ब्रॉडरी केलेला ब्लाऊज परिधान केला जातो तेव्हा त्या साडीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. (Kalanjali Paithani Designs)3 / 10पैठणीवर प्रामुख्यानं मोर, कमळ, राजहंस, फुलांची नक्षी असते. एम्ब्रॉडरी ब्लाऊजमध्येही यात नक्षीचा वापर केला जातो आणि सुसुत्रता आणली जाते.4 / 10एम्ब्रॉडरी ब्लाऊजवर प्रामुख्यानं जरीकाम, जरदोरी, रेशीम, धाग्यांचे काम आणि मण्यांचा वापर केला जातो. यामुळे ब्लाऊजचा एक हेवी आणि डिझायनर लूक मिळतो.5 / 10या साड्यांचे रंग अतिशय गडद आणि आकर्षक असतात. ब्लाऊजवर साडीच्या काठांच्या रंगाची किंवा साडीतील विरोधाभाससी रंगांची एम्ब्रॉयडरी केल्यामुळे तो अतिशय उठावदार दिसतो.6 / 10 लग्नकार्य किंवा मोठ्या सण-समारंभांसाठी कलांजली पैठणी विथ एम्ब्रॉयडरी ब्लाऊज महिलांची पहिली पसंती असते.7 / 10 ही जोडी जुन्या परंपरेला अधुनिक फॅशनची जोड देते. ज्यामुळे तरूणींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनाच हा पेहराव आवडतो8 / 10ब्लाऊजच्या गळ्यावर किंवा बाहीवर केलेले नाजूक एम्ब्रॉयडरीचे काम साडीच्या पदराची मेळ खाणारे असते. जे संपूर्ण व्यक्तीमत्वाला एक वेगळीच शान देते.9 / 10कलांजली पैठणीसोबत जेव्हा एम्ब्रॉयडरी ब्लाऊज घातले जाते तेव्हा त्यावर ठुशी कोल्हापूरी साज किंवा चिंचपेटी यांसारखे पारंपारीक दागिने अधिक उठून दिसतात. ब्लाऊजवरील जरदोजी काम आणि सोन्याचे दागिने एकमेकांना पुरक ठरतात.10 / 10साडीचा पदर पिनअप करताना किंवा मोकळा सोडताना ब्लाऊजवर केलेले कलाकुसरीचे काम सर्वांचे लक्ष वेधून घेते.