1 / 8१. लसूण कटर – लसूण सोलून छोट्या तुकड्यांत पटकन कापण्यासाठी हे छोटे हँडी गॅजेट उपयोगी ठरते. सुरीने बारीक चिरण्यापेक्षा कमी वेळात आणि कमी मेहनतीत काम होते. रोजच्या फोडणीसाठी हा चांगला पर्याय आहे.2 / 8२. मिनी व्हेजिटेबल चॉपर – कांदा, टोमॅटो, मिरची किंवा कोथिंबीर बारीक चिरण्यासाठी छोटा मॅन्युअल चॉपर उपयोगी पडतो. दोरी ओढून किंवा दाब देऊन भाज्या लवकर चिरता येतात. कमी प्रमाणात भाजी चिरायची असेल तर हा उत्तम पर्याय आहे.3 / 8३. पीलर – बटाटा, गाजर, काकडी, सफरचंद यांची साल पातळ काढण्यासाठी साधा पीलर खूप सोयीचा असतो. सुरीपेक्षा सुरक्षित आणि वेळ वाचवणारा हा छोटा पण आवश्यक टूल आहे.4 / 8४. व्हिस्कर – दूध, ताक, सूप, सॉस आदी फेटण्यासाठी छोटा स्टील व्हिस्कर उपयुक्त असतो. हाताने चमच्याने फेटण्यापेक्षा मिश्रण छान मऊ आणि फेसाळ होते.5 / 8५. मोजमाप चमचे (मेझरिंग स्पून्स) – केक, बेकिंग किंवा ठराविक प्रमाणात मसाले घालण्यासाठी मोजमाप चमचे खूप उपयोगी पडतात. अंदाजाने न घालता योग्य प्रमाण मिळते.6 / 8६. लिंबू स्क्विझर – लिंबाचा रस काढताना बिया वेगळ्या राहतात आणि हाताला त्रास होत नाही. कमी मेहनतीत पूर्ण रस निघतो. सरबत किंवा सॅलडसाठी हा छोटा गॅजेट फार कामाचा आहे.7 / 8७. मल्टीपर्पज ग्रेटर – चीज, गाजर, काकडी किंवा नारळ किसण्यासाठी छोटा ग्रेटर उपयुक्त असतो. वेगवेगळ्या आकाराचे छिद्र असल्यामुळे बारीक किंवा जाड किस करता येतो.8 / 8८. किचन कात्री – पॅकेट्स कापणे, कोथिंबीर चिरणे किंवा छोटे फूड आयटम कापण्यासाठी किचन कात्रीचा वेगळा छान सेट मिळतो, उपयुक्त ठरते.