Virat Kohli Birthday : विराट अनुष्काची एक दुजे के लिए लव्हस्टोरी! अनुष्का शर्मा सांगते, आम्ही लग्न तर केलं पण..

Updated:November 5, 2025 13:14 IST2025-11-05T12:44:21+5:302025-11-05T13:14:52+5:30

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या अपूर्व प्रेमकहाणीचे खास क्षण, लग्नाची गोष्ट आणि लग्नानंतरचे सुरुवातीचे ६ महिने.

Virat Kohli Birthday : विराट अनुष्काची एक दुजे के लिए लव्हस्टोरी! अनुष्का शर्मा सांगते, आम्ही लग्न तर केलं पण..

भारतीय क्रिकेट संघाचा किंग कोहली म्हणजे विराट कोहली आज त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. आता विराट कोहली हे नाव घेतलं की आपसुकच त्याच्यासोबत आठवण होते ती त्याच्या पत्नीची म्हणजेच अनुष्का शर्माची..

Virat Kohli Birthday : विराट अनुष्काची एक दुजे के लिए लव्हस्टोरी! अनुष्का शर्मा सांगते, आम्ही लग्न तर केलं पण..

अनुष्का आणि विराटची म्हणजेच विरुष्काची लव्हस्टोरी हा अख्ख्या जगासाठी चर्चेचा विषय आहे. त्यातही विशेषत: चर्चा होते ती तिच्यासाठी असलेल्या त्याच्या हळवेपणाची. एरवी तो अतिशय कणखर, खंबीर असतो. पण अनुष्काशी वागताना- बोलताना मात्र तो तेवढाच मृदू, कोमल, हळवा झालेला दिसतो.

Virat Kohli Birthday : विराट अनुष्काची एक दुजे के लिए लव्हस्टोरी! अनुष्का शर्मा सांगते, आम्ही लग्न तर केलं पण..

आज दोन चिमुकल्यांचे आई- बाबा असणाऱ्या विरुष्काची लव्हस्टोरी २०१३ मध्ये एका शाम्पूच्या जाहिरातीदरम्यान सुरू झाली. त्यानंतर पुढे काही वर्ष त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सगळ्यांपासून लपवून ठेवली आणि नंतर २०१७ मध्ये त्यांनी लग्न केलं.

Virat Kohli Birthday : विराट अनुष्काची एक दुजे के लिए लव्हस्टोरी! अनुष्का शर्मा सांगते, आम्ही लग्न तर केलं पण..

विराटबाबत बोलताना अनुष्का म्हणते की तो तिचा बेस्ट फ्रेंड आहे. मी अशा व्यक्तीशी लग्न केलंय जो मला मनापासून आवडला आहे आणि एक माणूस म्हणून तो अतिशय चांगला आहे. जेव्हा आम्ही दोघं सोबत असतो तेव्हा तेच आमचं विश्व असतं.

Virat Kohli Birthday : विराट अनुष्काची एक दुजे के लिए लव्हस्टोरी! अनुष्का शर्मा सांगते, आम्ही लग्न तर केलं पण..

लग्नानंतरची काही वर्ष एकमेकांची प्रचंड ओढ असते. एकमेकांसोबतच दिवस घालवावे वाटतात. पण अनुष्का म्हणते की सुरुवातीचे ६ महिने आम्ही जास्तीत जास्त २१- २२ दिवस एकमेकांसोबत घालवले असतील. कारण दोघंही आपापल्या कामात खूप बिझी होते. त्यामुळे त्या दिवसांत आम्ही एका घरात एकत्र असणं ही आमच्यासाठी जेवढी एक्सायटिंग गोष्ट असायची, तेवढीच ती आमच्या हाऊस स्टाफसाठीही होती.

Virat Kohli Birthday : विराट अनुष्काची एक दुजे के लिए लव्हस्टोरी! अनुष्का शर्मा सांगते, आम्ही लग्न तर केलं पण..

अनुष्का म्हणते विराट गोष्टी खूप लक्षात ठेवतो. अगदी छोटी- छाेटी बाबही त्याला पक्की माहिती असते. आणि त्याउलट मी सगळंच विसरून जाते. आम्ही जेव्हा डेट करायचो, तेव्हा त्याच्या याच लहान- सहान गोष्टी मला आवडायच्या आणि मला असं मनोमन वाटायचं की लाईफ पार्टनर म्हणून हाच परफेक्ट आहे...

Virat Kohli Birthday : विराट अनुष्काची एक दुजे के लिए लव्हस्टोरी! अनुष्का शर्मा सांगते, आम्ही लग्न तर केलं पण..

विराट किती उत्तम नवरा, लाईफ पार्टनर आहे याचा अनुभव तर आज अनुष्का घेतच आहे, पण तो ज्या पद्धतीने तिच्यावरचं प्रेम वेळोवेळी व्यक्त करतो, त्यावरून ही गोष्ट आता अख्ख्या जगालाही समजली आहे.