अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 14:34 IST
1 / 9जोडप्यांना अनेकदा असं वाटतं की, महागडे गिफ्टस, रोमँटिक डिनर किंवा बाहेर फिरायला जाणं हे मजबूत आणि आनंदी नात्यासाठी आवश्यक आहे. पण हे खरं नाही. कारण एकमेकांसाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनही प्रेम फुलतं. 2 / 9तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी दररोज एकमेकांशी बोलण्यासाठी वेळ काढा. तुम्ही तुमच्या पार्टनरची चौकशी केली पाहिजे. 'आज तुझा दिवस कसा होता?' सारख्या छोट्या छोट्या गोष्टी देखील तुम्हाला जवळ आणतात आणि पार्टनरलाही छान वाटतं3 / 9बोलण्याइतकंच लक्षपूर्वक ऐकणं हे देखील महत्त्वाचं आहे. जेव्हा पार्टनर खरोखर एकमेकांचं ऐकतात आणि कधीकधी विचारपूर्वक प्रश्न विचारतात तेव्हा ते नातं अधिक घट्ट होतं.4 / 9एक छोटंस थँक्यू तुमच्या पार्टनरसाठी खूप महत्त्वाचं असू शकतं. जर तुमचा पार्टनर तुम्हाला रोजच्या छोट्या मोठ्या कामांमध्ये मदत करत असेल तर तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजेत. यामुळे प्रेम आणि आदर दोन्ही वाढतो.5 / 9प्रेमाने हात धरणं, मिठी मारणं, किस करणं यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीने नातं अधिक मजबूत होतं. प्रेम व्यक्त केल्याने आपला पार्टनरही आनंदी होतो. त्याला छान वाटतं.6 / 9घरातील काम एकत्र करा. कामाचं ओझं वाटू नये म्हणून दोघांनी कामं वाटून घ्या म्हणजे कामं वेळेत पूर्ण होतील आणि जास्त कष्टही घ्यावे लागणार नाहीत. नातं घट्ट होईल.7 / 9पार्टनरला खूश करण्यासाठी नेहमीच काहीतरी भव्यदिव्य करण्याची गरज नाही. आपल्या हाताने बनवलेला आवडीचा पदार्थ, एखादी चिठ्ठी, चॉकलेट, फुलं पार्टनरच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतात. 8 / 9कामाच्या व्यस्त शेड्यूलमधून एकमेकांसाठी थोडासा का होईना वेळ काढा. बाहेर फिरायला जा. एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. एकमेकांना समजून घ्या. 9 / 9मोबाईलपासून दूर राहून एकमेकांसोबत मनसोक्त हसा अन् खूश राहा. गप्पा मारा, नवनवीन गोष्टी एकमेकांशी शेअर करा. एकमेकांच्या आवडी-निवडी जपा. यामुळे नातं अधिक सुंदर होतं आणि प्रेम वाढतं.