Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मराठी अभिनेत्री माय-लेकींच्या १० जोड्या; पाहा मराठी सेलिब्रिटी माय-लेकींचे न पाहिलेले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:56 IST

1 / 10
प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदीनं आपल्या आई-वडीलांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. (Marathi Actress Mother-Daughter)
2 / 10
लाघवी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऋजुता देशमुख आणि त्यांची मुलगी साजरी यांची जोडी सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे.
3 / 10
सुप्रिया पिळगावकर यांनी मराठीतच नाही हिंदी सिनेसृष्टीतही नाव मिळवले आहे. तर श्रियानं वेब सिरिज आणि चित्रपटांमधून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
4 / 10
जेष्ठ अभिनेत्री उज्वला जोग यांची मुलगी क्षित जोग ही मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक कसलेली अभिनेत्री आणि निर्माती आहे.
5 / 10
ज्योती सुभाष आणि अमृता सुभाष ही माय लेकींची जोडी त्यांच्या नैसर्गिक आणि वास्तववादी अभिनयासाठी ओळखली जाते.
6 / 10
दिग्गज अभिनेत्री दिवंगत रीमा लागू यांची मुलगी मृण्मयी ही देखील एक उत्तम अभिनेत्री आणि दिगदर्शिका आहे.
7 / 10
मेधा मांजरेकर या मराठीतली प्रस्थापित अभिनेत्री आहेत तर सईने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
8 / 10
अभिनेत्री सोनाली खरे आणि तिची मुलगी सनाया यांची जोडी त्यांच्या ग्लॅमरस लूक आणि बॉन्डींगसाठी चर्चेत असते.
9 / 10
ज्येष्ठ रंगकर्मी ज्योती चांदेकर यांची मुलगी तेजस्विनी पंडित ही आजच्या काळातील आघाडीची आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे.
10 / 10
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रंजना देशमुष या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या कन्या होत्या. या दोघींनीही सिनेसृष्टी गाजवली आहे.
टॅग्स : मराठी अभिनेतारिलेशनशिप