Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 17:50 IST
1 / 20नाव घ्यावंच लागणार, नाव घे. असं म्हणत लग्नकार्यात किंवा कोणत्याही खास प्रसंगात उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो. लग्नात उखाण्याची छोटीशी गंमत वेगळाच आनंद देऊन जाते. नवी नवरी, नवरा मुलगा कोणता उखाणा घेणार याची उत्सुकता लग्नघरातल्या प्रत्येकालाच असते. (Marathi ukhane) 2 / 20नेहमी तेच टिपिकल भाजीत भाजी, शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून असे उखाणे घेण्यापेक्षा जर तुम्ही नवा ऊखाणा ट्राय केला तर त्या उखाण्यामुळे तुम्ही सगळ्यांच्याच लक्षात राहाल. (Marathi ukhane for female romantic) आज तुम्हाला काही खास उखाणे सुचवणार आहोत. लग्नात किंवा कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही असे उखाणे घेऊ शकता. 3 / 20नाव घ्या, नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा,..... रावांचेच नाव असंत ओठी, पण प्रश्न पडतो उखाण्याचा4 / 20 नवे घर ,नवे लोक, नवी नवी नाती, संसार होईल मस्त……राव असता सोबती5 / 20गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, …. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.6 / 20नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, ….रावांना शेवटी अहोच म्हणायचे.7 / 20जेवणाच्या पंगतीत, उखाणा घेते खास, ..रावांना देता देता, चा घास8 / 20तेलाच्या दिव्याला तुपाची वात,.....रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरूवात9 / 20 काढ्यात काढा पाटणकर काढा.....रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा10 / 20रुपेरी सागरावर चंदेरी लाट,…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट. 11 / 20रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,…. रावांना भरवते मी श्रीखंड-पुरीचा घास12 / 20 काचेच्या बशीत बदामचा हलवा,….. रावांचे नाव घेते, सासुबाईंना बोलवा13 / 20लावीत होते कुंकू, त्यात सापडला मोती, …… पति मिळाले म्हणून भाग्य मानू किती.14 / 20मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, …. बरोबर संसार करीन सुखाचा.15 / 20श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा, आमच्या ….. आवडतो गरमगरम बटाटेवडा. 16 / 20 तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.17 / 20साखरेचं पोतं सुईनं उसवलं; ......नं मला पावडर लावून फसवलं18 / 20पाच बोटातून होते कलेची निर्मिती, …. वर जडली माझी प्रीती. 19 / 20 खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका, ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.20 / 20मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, …. बरोबर संसार करीन सुखाचा.