दीपिका - रणवीरच्या रोमँटिक नात्याची गोष्ट - आता आईबाबा होणाऱ्या जोडप्याची खास कहाणी
Updated:March 1, 2024 13:04 IST2024-03-01T13:00:48+5:302024-03-01T13:04:36+5:30
Deepika Padukone Ranveer Singh parents to be

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील एक पॉवर कपल म्हणून प्रसिद्ध आहे (Deepika Padukone Ranveer Singh parents to be) .
नोव्हेंबर २०१८ मध्ये दिपवीरने कोकणी आणि सिंधी पद्धतीने मोठ्या शाही सोहळ्यात लग्नगाठ बांधत आपले नाते अधिकृत केले.
लग्नानंतर ६ वर्षांनी या दोघांनी आपल्याकडे गुडन्यूज असल्याचे जाहिर केले असून सप्टेंबरमध्ये ते आपल्या बाळाला जन्म देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अभिनयासोबतच अतिशय संयत अशा वागण्यामुळे या दोघांचे असंख्य चाहते असून या गोड बातमीने चाहतेही खूश झाले.
प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, आलिया भट, बिपाशा बासू आणि करीना कपूर यांसारख्या बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींनंतर आता दीपिका आई होणार असल्याने चाहत्यांनी तिच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.
चेहऱ्यावर कायम असणारी गोड स्माईल, उंची आणि नैसर्गिक सौंदर्य यांमुळे दीपिका अनेकांची आवडती अभिनेत्री आहे.
रणवीर आणि दीपिका यांच्यातील बाँडही खास असल्याचे आपल्याला विविध फोटो आणि व्हिडिओमधून कायम दिसून येते.
आता हे दोघेही लवकरच आई-वडीलांच्या नवीन भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबतच चाहत्यांनाही त्यांच्या बाळाची प्रतिक्षा आहे.