Join us
Daily Top 2 Weekly Top 5

नवरा-बायकोतली भांडण वाढू नयेत म्हणून करा 'या' ५ गोष्टी, जोडीदार आपोआप चांगलं वागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:27 IST

1 / 7
संसार म्हटलं की कुरबुरी या आल्याच पण या भांडणाचे रुपांतर वादात होऊन नात्यात दुरावा येऊ नये यासाठी समंजसपणा दाखवणं फार गरजेचं असतं. (5 Things Happy Couples Do After A Fight)
2 / 7
कोणतंही नातं परिपूर्ण नसते. त्यामुळे एकमेकांच्या स्वभावातील दोष स्वीकारून वादापेक्षा संवादाला महत्व देणं हाच सुखी संसाराचा पाया आहे. ५ गोष्टी फॉलो केल्यास नवरा-बायकोतील नातं अधिक घट्ट होण्यास मदत होईल. (How To Repair After A Fight)
3 / 7
भांडण सुरू असताना रागाच्या भरात टोकाचं काहीही बोलण्यापेक्षा थोडा वेळ शांत राहणं उत्तम ठरतं. जेणेकरून वाद वाढणार नाहीत. (5 Thing's Healthy Couple Do When They Fight)
4 / 7
स्वत:ची बाजू मांडण्यापूर्वी जोडीदाराला काय म्हणायचं आहे ते शांतपणे ऐकून घ्या आणि त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
5 / 7
जर तुमची चूक असेल तर ती मोठ्या मनानं मान्य करा. एक सॉरी अनेक मोठे वाद एका क्षणात मिटवू शकते.
6 / 7
सुरू असलेल्या विषयांवरच बोला. जुन्या गोष्टी काढून एकमेकांना टोमणे मारणं टाळा.
7 / 7
राग शांत झाल्यावर एकत्र बसून मोकळेपणानं चर्चा करा आणि समस्येवर काय मार्ग काढता येईल याकडे लक्ष द्या.
टॅग्स : रिलेशनशिपरिलेशनशिप