By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:05 IST
1 / 10नात्यामध्ये वारंवार राग येणं हे केवळ स्वभावामुळे नसते तर अनेक भावनिक आणि व्यावहारीक कारणं असू शकतात. नात्यात दुरावा निर्माण होण्यापूर्वी कारणं समजून घ्यायला हवं.(10 Reasons Why Frequent Anger In Relationship)2 / 10 जेव्हा तुम्ही मनातल्या गोष्टी स्पष्टपणे जोडीदाराला सांगू शकत नाही तेव्हा ती घुसमट रागाच्या स्वरूपात बाहेर येते. त्याला किंवा तिला न सांगता समजायला हवं ही अपेक्षा अनेकदा वादाचं कारण ठरते. (Whats Make You Angrey In Relationship)3 / 10जोडीदाराकडून खूप जास्त अपेक्षा ठेवणं त्या पू्र्ण न होणं यामुळे चिडचिड होते. प्रत्येकवेळी समोरची व्यक्ती तुमच्या मनासारखंच वागेल असं नाही.4 / 10भूतकाळातील चुका किंवा वाद वारंवार काढल्यामुळे मनात कडवटपणा राहतो. यामुळे सध्याच्या छोट्या गोष्टींवरही खूप मोठा राग येतो.5 / 10 जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा जोडीदार तुमच्या मताची किंमत करत नाही किंवा इतरांसमोर तुमचा अपमान करतो तर मानत राग साचत जातो.6 / 10कामाच्या व्यापात किंवा इतर कारणांमुळे एकमेकांना पुरेसा वेळ न देणं यामुळे नात्यात दुर्लक्षित वाटू शकतं.7 / 10 नात्यात विश्वास नसेल तर प्रत्येक गोष्टीत संशयानं पाहिलं जातं. यातून होणारी चौकशी आणि स्पष्टीकरण दोघांच्याही रागाला खतपाणी घालतात.8 / 10 घरातील कामं किंवा आर्थीक जबाबदाऱ्या केवळ एकाच व्यक्तीवर पडत असतील तर त्या व्यक्तीला थकवा किंवा मानसिक ताण येतो जो रागाच्या स्वरूपात बाहेर येतो.9 / 10आपल्या जोडीदाराची तुलना दुसऱ्याच्या जोडीदाराशी किंवा नातेवाईकांशी केल्यामुळे व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जातो.10 / 10 प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा असा थोडा वेळ हवा असतो. जेव्हा जोडीदार खूप जास्त पझेसिव्ह असतो किंवा सतत सोबत राहण्याचा आग्रह धरतो तेव्हा नात्यावर त्याचा परिणाम होतो.