By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 14:56 IST
1 / 11कुटूंब हे सुसंवादी आणि आनंदी राहण्यासाठी काही मूलभूत नियमांची गरज असते. जेव्हा कुटूंबातील प्रत्येक सदस्य ठराविक शिस्त पाळतो तेव्हा घरात प्रेम आणि आदर वाढतो. (10 Brutally Honest Family Rules That every member Should Follow)2 / 11 वयानं लहान असो वा मोठे प्रत्येकाशी आनंदानं बोलायला हवं. टोमणे मारणं किंवा अपमानकारक शब्द वापरणं टाळावं.3 / 11 दिवसातून किमान एक वेळचं जेवण सर्वांनी बसून एकत्र घ्यावे. यामुळे संवाद वाढतो आणि जवळीक निर्माण होते.4 / 11जेवताना किंवा एकत्र गप्पा मारताना मोबाईल टिव्ही किंवा लॅपटॉप बाजूला ठेवा. एकमेकांच्या डोळ्यांत पाहून बोलण्याची सवय लावा.5 / 11घरची कामं ही केवळ आईची किंवा एकाच व्यक्तीची जबाबदारी नसून ती सर्वांची आहे. स्वत:ची कामं स्वत: करा6 / 11 मदभेत होणं स्वाभाविक आहे पण ओरडून किंवा अबोला धरून प्रश्न सुटत नाहीत. शांत बसून आपलं म्हणणं मांडणं आणि दुसऱ्याचं ऐकून घेणं महत्वाचे आहे.7 / 11 कुटूंबात कधीच एकमेकांपासून गोष्टी लपवू नये. आर्थिक व्यवहार किंवा बाहेर घडणाऱ्या महत्वाच्या गोष्टींबाबत घरात सत्य सांगावे.8 / 11मिळवलेला पैसा विचारपूर्वक खर्च करावा. भविष्यासाठी बचत करणं हा कौटुंबिक शिस्तीचा भाग असावा.9 / 11 सकाळी उठण्याच्या, झोपण्याच्या आणि अभ्यासाच्या वेळा निश्चित असाव्यात. वेळेचं नियोजन असेल तर घराईत घाई गडबड आणि चिडचिड कमी होते.10 / 11घरातील व्यक्तीनं आपल्यासाठी केलेल्या छोट्या गोष्टींची कौतुक करा. आपली चूक झाल्यास सॉरी म्हणा.11 / 11 एकत्र राहत असलो तरी प्रत्येकाला स्वत:ची स्पेस हवी असते. कोणाच्याही खोलीत जाताना विचारून जाणं महत्वाचा नियम आहे.