Join us   

५ गोल्ड मेडल्स जिंकणाऱ्या लेकाविषयी आर. माधवन सांगतो, मुलाला आवडतं ते करु दिलं कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2023 5:41 PM

1 / 8
प्रसिद्ध अभिनेता आर माधवन म्हणजे असंख्य मुलींचा दिलाची धडकन. पण अभिनेता म्हणून यशस्वी असलेला माधवन वडील म्हणूनही तितकाच यशस्वी आहे (Vedant Madhvan Son of Actor R Madhavan Parenting).
2 / 8
आतापर्यंत आपण आणि आपली पत्नी सरीताने वेदांतच्या बाबतीत जे निर्णय घेतले त्याबद्दल आपल्याला कधीच रीग्रेट नव्हता आणि नाही. अशी खंत वाटावी असं आपण काही केलंही नाही असंही माधवन पुढे म्हणाला.
3 / 8
वेदांत माधवन हा आर माधवनचा मुलगा जलतरणपटू आहे. नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वेदांतने भारताला ५ सुवर्ण पदके मिळवून दिली.
4 / 8
टिन एजमध्ये असताना वेदांतला मोकळा वेळ मिळतोय असं व्हायचं नाही. कारण तो त्याला आवडणाऱ्या गोष्टी करत असायचा असं सरीता यांनी बोलताना सांगितले.
5 / 8
पालकत्वाच्या भूमिकेबद्दल बोलताना आर माधवन म्हणतो, एक पालक म्हणून मीही अनेकदा असुरक्षित होतो आणि मीही इतर पालकां इतक्याच चुका केल्या असतील. इतर मध्यमवर्गीय कुटुंबियांना नसतील असे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मला होते.
6 / 8
वेदांतला जलतरणाचे उत्तम ट्रेनिंग मिळावे यासाठी आर माधवन आणि त्याची पत्नी सरीता त्याला घेऊन काही महिन्यांपासून दुबई येथे राहत आहेत.
7 / 8
स्टार किड्सच्या नखऱ्यांची, घराणेशाहीची चर्चा होते मात्र वडील सुपरस्टार असूनही खेळात जीवतोड मेहनत करत वेदांतने आपली वाट निवडली आहे.
8 / 8
टॅग्स : पालकत्वआर.माधवनपोहणेलहान मुलं