1 / 10Bollywood Celebrity With Military Background : सध्या भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीची सगळीकडे चर्चा सुरू आहे. भारतीय सैन्यांबाबत वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा केली जात आहे. अशातच विषय निघतो अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आणि त्यांच्या कुटुंबांच्या आर्मीच्या बॅकग्राउंडचा. बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या भारतीय सैन्यात सेवा दिली आहे. ज्याचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. अशाच काही अभिनेत्रींबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.2 / 10अभिनेत्री अनुष्का शर्माचे वडील कर्नल अजय कुमार शर्मा भारतीय सेनेत होते. हेच कारण आहे की, तिचं बालपण आर्मी कंटोनमेंट असलेल्या वातावरणात गेलं आहे. जिथे ती शिस्त आणि देशप्रेम शिकली.3 / 10तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, देसीगर्ल प्रियांका चोप्राचे आई आणि वडील दोघेही आर्मीमध्ये डॉक्टर होते. प्रियांकाचे वडील डॉ. अशोक चोप्रा भारतीय सेनेत सर्जन होते.4 / 10मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचे वडील शुबीर सेन हे भारतीय वायुसेनेत विंग कमांडर होते.5 / 10अभिनेत्री निमरत कौरचे वडील भूपेन्दर सिंह हे भारतीय सेनेत मेजर होते. जे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत शहीद झाले होते. त्यांना शौर्य चक्रानं सन्मानित करण्यात आलं होतं.6 / 10बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री गुल पनागचे वडील एच.एस. पनाग भारतीय सेनेत लेफ्टनंट जनरल पदावर होते. 7 / 10अभिनेत्री नेहा धूपियाचे वडील कमांडर प्रदीप सिंह धूपिया इंडियन नेव्हीमध्ये मोठे अधिकारी होते.8 / 10चित्रांगदाचे वडील कर्नल निरंजन सिंह आर्मीमध्ये होते आणि हैदराबादच्या ईएमईमध्ये गोल्फ कोचही होते.9 / 10प्रिती झिंटाचे वडील देखील भारतीय सेनेत अधिकारी होते. मात्र, प्रिती झिंटा 13 वर्षांची असताना तिच्या वडिलांचं एका कार अपघातात निधन झालं. यावेळी तिची आई सुद्धा कारमध्ये होती, सुदैवानं त्यांचा जीव वाचला.10 / 10लारा दत्ताचे वडील एल.के. दत्ता भारतीय वायुनेसेत विंग कमांडर पदावर होते. इतकंच नाही तर त्यांच्या दोन्ही बहिणींनी सुद्धा भारतीय वायुसेनेत सेवा दिली आहे.