By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:27 IST
1 / 12सिंगर निक जोनासने आयुष्यातील अत्यंत नाजूक आणि भावनिक टप्प्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे, जेव्हा तो आणि प्रियंका चोप्रा पहिल्यांदा आई-वडील झाले. मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास हिच्या जन्मानंतरचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. 2 / 12आता पहिल्यांदाच निकने त्या काळातील वेदना, भीती आणि भावना शब्दांत व्यक्त केल्या आहेत. ही जोडी त्यांच्या स्ट्राँग नात्यासाठी आणि एकमेकांना देणाऱ्या सपोर्टसाठी जगभरात ओळखली जाते. 3 / 12सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघंही अनेकदा त्यांच्या कौटुंबिक जीवनाची झलक दाखवत असतात, पण यावेळी निकने मनाला भिडणारी एक अशी गोष्ट शेअर केली आहे, ज्यामुळे चाहतेही भावूक झाले आहेत.4 / 12निकने मालतीच्या जन्मानंतरच्या अनुभवांबद्दल सांगितलं, 'तिचा जन्म अत्यंत कठीण परिस्थितीत झाला, ज्याबद्दल मी यापूर्वी कधीही बोललो नव्हतो. ती एप्रिलमध्ये जन्माला येईल अशी आम्हाला अपेक्षा होती, पण अचानक आम्हाला फोन आला की तिची डिलिव्हरी लवकर होणार आहे.'5 / 12'आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि जेव्हा ती जन्माला आली, तेव्हा तिचं वजन फक्त १ पाउंड ११ औंस (७६५ ग्रॅम) होतं आणि ती जवळपास काळानिळी पडली होती.' 6 / 12निकने पुढे सांगितलं की, एनआयसीयू (NICU) मधील नर्सनी तिची काळजी घेतली. मालतीला घरी आणेपर्यंत निक आणि प्रियंका दररोज हॉस्पिटलमध्ये १२-१२ तासांच्या शिफ्ट करायचे. 7 / 12निक म्हणाला, 'तो कोरोनाचा काळ होता, त्यामुळे मी आणि प्रियंका साडेतीन महिने हॉस्पिटलमध्ये १२-१२ तास होतो. काही गोष्टी नेहमीच हृदय पिळवटून टाकणाऱ्या असतात. तिथे दररोज असणं आणि इतर कुटुंबांनाही अशाच परिस्थितीतून जाताना पाहणं हे दिलासादायक आणि भीतीदायक दोन्ही होतं.'8 / 12'मालतीने साडेतीन महिने दररोज संघर्ष केला आणि हळूहळू तिचं वजन वाढू लागलं. सहा वेळा रक्त चढवल्यानंतर तिच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली. साडेतीन महिन्यांनंतर आम्ही तिला घरी आणलं.'9 / 12प्रियंकाची बहीण परिणीती चोप्रा हिनेही प्रियंकाचे खूप कौतुक केलं होते. जेव्हा मालती तीन महिन्यांची झाली, तेव्हा परिणीतीने निक आणि प्रियंकासाठी एक पोस्ट लिहिली होती. 'गेल्या तीन महिन्यांतील अडचणींवर मात करून तुम्हा दोघांना असं पाहणं प्रेरणादायी आहे.' 10 / 12'मिमी दीदी (प्रियंका) – मी तुला हॉस्पिटलमध्ये एका सैनिकासारखं लढताना पाहिलं आहे. या छोट्याशा मुलीने आपल्याला आधीच खूप काही शिकवलं आहे. चला, आता तिचे लाड करण्याची वेळ आली आहे!'11 / 12निकने २०१८ मध्ये राजस्थानमध्ये प्रियंका चोप्राशी लग्न केलं होतं. त्यांनी ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतींनी लग्न केलं. उदयपूरच्या भव्य वास्तूत झालेल्या या लग्नाला केवळ जवळचे कुटुंबीय उपस्थित होते. जानेवारी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे त्यांची पहिली मुलगी मालतीचा जन्म झाला.12 / 12निक जोनास लवकरच पॉल रूडसोबत 'पॉवर बॅलाड' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होईल. प्रियंका चोप्रा एस.एस. राजामौली यांच्या 'वाराणसी' चित्रपटात महेश बाबूसोबत दिसणार असल्याची चर्चा आहे.