1 / 9प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांच्या मुलांनी जीवनात खूप प्रगती करावी, नेहमी (negative parenting styles that affect children) आनंदी राहावे आणि त्याला जगातील सर्व सुखसोयी मिळाव्यात. या इच्छेपायी पालक अहोरात्र कष्ट करतात. मात्र, मुलांचे भविष्य घडवण्याच्या नादात अनेकदा पालक अशा काही चुका करतात, ज्याचा थेट परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि त्यांच्या निरागस बालपणावर होतो.2 / 9आजच्या स्पर्धात्मक युगात नकळतपणे अशा काही पेरेंटिंग स्टाईल्स (Parenting Styles) आहेत, ज्या मुलांना शिस्त लावण्याऐवजी त्यांच्यात भीती, तणाव आणि नकारात्मकता (5 negative parenting habits to avoid) निर्माण करत आहेत. काही विशिष्ट प्रकारच्या पालकत्व पद्धतींमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यांचे हसते-खेळते बालपण एका दडपणाखाली दबले जाते.3 / 9मुलांचे बालपण हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात नाजूक, आनंदी आणि घडणाऱ्या टप्प्यांपैकी एक असते. याच काळात त्यांचा भावनिक, मानसिक आणि सामाजिक विकास घडत असतो. मात्र अनेक वेळा पालक नकळत काही अशा पॅरेंटिंग पद्धती अवलंबतात, ज्या मुलांच्या नैसर्गिक आनंदावर मर्यादा आणतात आणि त्यांच्याकडून बालपणच हिरावून घेतात. अशाच ५ चुकीच्या पेरेंटिंग पद्धतींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या मुलांच्या विकासासाठी अडथळा ठरू शकतात.4 / 9 या पद्धतीमध्ये पालकांचे मुलांवर अतोनात नियंत्रण असते. मुलांच्या प्रत्येक हालचालीवर कडक नियम लादले जातात. आई-वडील सतत 'हे करू नको', 'असंच वागायला हवं', 'मी म्हंटलंय म्हणून हे केलंच पाहिजे' अशा कडक शब्दांत मुलांशी संवाद साधतात. यात मुलांच्या मताला किंवा त्यांच्या आवडीनिवडीला अजिबात महत्त्व दिले जात नाही. अशा वातावरणात वाढलेली मुलं केवळ भीतीपोटी आज्ञाधारक बनतात, पण ती मनातून कधीच आनंदी नसतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होते. सततच्या दडपणामुळे त्यांच्यात भीती किंवा भविष्यात विद्रोही भावना वाढण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी मुलांशी मनमोकळेपणाने संवाद साधा. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या. जर तुम्ही एखादा नियम लावत असाल, तर त्यामागचे योग्य कारण त्यांना प्रेमाने समजावून सांगा.5 / 9 काही पालकांना वाटते की मुलाला हवं ते देणं म्हणजे प्रेम, पण ही 'अति-सवलत' मुलांसाठी घातक ठरू शकते. या पद्धतीत मुलांना इतकी जास्त मोकळीक दिली जाते की, त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरकच समजत नाही. मुलाची प्रत्येक हट्ट किंवा मागणी लगेच पूर्ण करणे, त्यांना कोणत्याही गोष्टीला 'नाही' न म्हणणे आणि त्यांच्या अभ्यासावर किंवा वर्तणुकीवर अजिबात नियंत्रण न ठेवणे, अशी या पालकांची शैली असते. अशा वातावरणात वाढलेली मुले अत्यंत बेजबाबदार आणि शिस्तहीन बनू शकतात. त्यांना नियमांची सवय नसते, त्यामुळे बाहेरच्या जगात वावरताना किंवा छोट्याशा अपयशानेही ती मुले खूप चिडचिडी होतात. त्यांना वाटतं की जगाने त्यांच्या मनाप्रमाणेच वागावे. मुलांना प्रेम नक्की द्या, पण त्यासोबतच मर्यादा आखून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांना स्वातंत्र्यासोबतच स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी.6 / 9जेव्हा आई-वडील आपल्या कामात, फोनमध्ये किंवा स्वतःच्या खासगी समस्यांमध्ये इतके बिझी होतात की, मुलांच्या भावना, त्यांच्या गरजा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष होते, तेव्हा त्याला 'नेग्लेक्टफुल पेरेंटिंग' म्हणतात. मुलांना अशावेळी घरामध्ये असुरक्षित आणि उपेक्षित वाटू लागते. मूल विचार करू लागते की, आपल्या पालकांसाठी आपण महत्त्वाचे नाही आहोत. त्यांच्या मनात एक प्रकारचा एकलकोंडेपणा घर करू लागतो. अशा मुलांमध्ये नकारात्मक विचार, आत्मविश्वासाची कमतरता आणि घराबाहेर चुकीच्या संगतीला बळी पडण्याचा धोका सर्वाधिक असतो. पालकांकडून प्रेम न मिळाल्याने ती मुले बाहेर आधार शोधू लागतात. कामाचा व्याप कितीही असला तरी दिवसातील काही वेळ मोबाईल बाजूला ठेवून फक्त मुलांसोबत बसून गप्पा मारा. त्यांच्या दिवसाभराच्या गोष्टी ऐकून घ्या, जेणेकरून त्यांना तुमच्या प्रेमाची आणि आधाराची खात्री पटेल.7 / 9 पालक आपल्या मुलाच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी नेहमी दुसऱ्या मुलांचे उदाहरण देतात. त्यांना वाटते की यामुळे मुलाला प्रेरणा मिळेल, पण प्रत्यक्षात याचा उलटा परिणाम होतो. सततच्या तुलनेमुळे मुलामध्ये हीनभावना (Inferiority Complex) निर्माण होते. त्याला वाटू लागते की आपण कोणापेक्षा तरी 'कमी' आहोत. स्वतःचा आनंद शोधण्याऐवजी, ते मूल नेहमी इतरांसारखे बनण्याचा प्रयत्न करू लागते, ज्यामुळे त्याचे स्वतःचे व्यक्तिमत्व हरवते. प्रत्येक मूल हे वेगळं असतं. पालकांनी मुलाची क्षमता, त्याची शिकण्याची गती आणि त्याची आवड ओळखून त्याला प्रोत्साहन द्यावे. मुलाची स्पर्धा ही इतरांशी नसून, त्याच्या स्वतःच्या प्रगतीशी असावी हे त्याला प्रेमाने पटवून द्या.8 / 9अनेकांना वाटते की मुलाला प्रत्येक संकटापासून वाचवणे म्हणजे चांगलं पालकत्व, पण हे ओव्हर प्रोटेकटींग पॅरेंटिंग मुलांच्या विकासात अडथळा ठरू शकते. अशा वातावरणात वाढलेली मुले भविष्यात जीवनातील छोट्या आव्हानांनाही घाबरू लागतात. त्यांच्यात आत्मनिर्भरतेचा अभाव असतो. आनंदाचा एक मोठा स्त्रोत म्हणजे स्वतः एखादी गोष्ट साध्य करणे, पण अशा मुलांना ती संधीच न मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास कधीच वाढत नाही. मुलांना सुरक्षित वातावरणात राहून त्यांची छोटी-मोठी कामे स्वतः करू द्या. त्यांना चुका करू द्या आणि त्या चुकांमधून धडा शिकण्याची संधी द्या. यामुळेच ती खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनतील.9 / 9६. एक आनंदी मूल तेच असते ज्याला हे मनापासून माहीत असते की, त्याचे आई-वडील त्याला समजून घेतात, त्याला पाठिंबा देतात आणि त्याच्यावर प्रेम करतात.