Join us
Daily Top 2 Weekly Top 5

'मी फक्त नावापुरता बाबा नाही...';आर माधवननं पालकांना सांगितला मुलांच्या संगोपनाचा खास मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 13:48 IST

1 / 10
अभिनेता आर. माधवने पालकत्वाविषयी आपले विचार मांडताना मुलांसोबत क्वालिटी टाईम घालवणं ही एक पाश्चात्य संकल्पना असल्याचं म्हटलं आहे. (R Madhvan's Parenting Tips)
2 / 10
माधवनच्यामते पालकांचे खरे काम मुलांना वेळेपेक्षा योग्य कौटुंबिक मूल्य शिकवणं आणि भावनिक आधार देणं हे असते.
3 / 10
त्यांचा मुलगा वेदांत ६ वर्षांचा असताना त्यानं बाबा तुम्ही माझ्यासोबत क्वालिटी टाईम घालवत नाही अशी तक्रार केली होती. त्यावेळचा एक किस्सा माधवने शेअर केला आहे.
4 / 10
यावर उत्तर देताना माधवने स्वत:च्या वडीलांचे उदाहरण दिले की, त्याचे वडील देखील त्याच्या शाळेत किंवा खेळाच्या सामन्यांना कधी आले नव्हते.
5 / 10
माधवनने आपल्या मुलाला स्पष्ट सांगितले की प्रत्येक शालेय कार्यक्रमाला हजर राहणारा कॉस्मेटीक फादर बनू शकत नाही. कारण त्याचा व्यवसाय त्याला त्याची परवानगी देत नाही.
6 / 10
परंतु वेदांतला जेव्हा कधीही कोणत्याही गोष्टींसाठी वडीलांची गरज भासेल तेव्हा तो नेहमी त्याच्या मदतीसाठी तयार असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
7 / 10
माधवनच्यामते मुलांनी इतर मुलांशी स्वत:ची तुलना न करता किंवा असुरक्षित न वाटून घेता एका सामान्य भारतीय मुलाप्रमाणे मनमोकळेपणानं आयुष्य जगले पाहिजे.
8 / 10
माधवनने आपल्या वडिलांकडून मिळालेल्या याच मुल्यांच्या आधारे वेदांतचे संगोपन केले आहे आणि त्याला केवळ वरवरची उपस्थिती लावण्यापेक्षा बिनशर्त पाठिंबा देणे अधिक महत्वाचं वाटतं.
9 / 10
माधवन आणि त्याचा मुलगा वेदांत रोज फोनवर बोलत नाहीत किंवा दरवेळी आय लव्ह यू म्हणत नाही पण कठीण प्रसंगात वेदांत सगळ्यात आधी आपल्या वडिलांनाच फोन करतो.
10 / 10
माधवनने आपल्या वडिलांकडून मिळालेल्या याच मुल्यांच्या आधारे वेदांतचे संगोपन केले आहे आणि त्याला केवळ वरवरची उपस्थिती लावण्यापेक्षा बिनशर्त पाठिंबा देणे अधिक महत्वाचं वाटतं.
टॅग्स : आर.माधवनपालकत्व