1 / 9मुलांच्या शारीरिक विकासात उंची हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उंची केवळ अनुवांशिकतेवर अवलंबून नसते, तर त्यावर योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप या गोष्टींचाही मोठा परिणाम होतो. 'माझ्या मुलाची किंवा मुलीची उंची वयानुसार वाढत नाहीये का?' हा प्रश्न आजकाल प्रत्येक पालकाच्या मनात असतो. इतर मुलांच्या तुलनेत आपल्या मुलांची उंची कमी वाटू लागली की लगेच विविध उपाय, सप्लिमेंट्स किंवा घरगुती प्रयोग सुरू होतात. अनेक पालक आपल्या मुलांच्या कमी उंचीमुळे चिंतेत असतात(7 simple daily habits to increase kids height naturally).2 / 9परंतु प्रत्येक मुलाची वाढ वेगवेगळी असते आणि उंची वाढण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम आणि निरोगी लाईफस्टाईल या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. जर तुम्हालाही आपल्या मुलांची उंची नैसर्गिकरीत्या वाढावी असं वाटत असेल, तर काही महत्त्वाच्या सवयी आणि उपाय जाणून घेणं आवश्यक आहे. मुलांची उंची चांगली वाढण्यासाठी पालकांनी नेमकं काय करायला हवं ते पाहा. 3 / 9 मुलांना दररोज थोडा वेळ उन्हात खेळू देणे अत्यंत आवश्यक आहे. सकाळचे किंवा संध्याकाळचे कोवळे ऊन शरीराला व्हिटॅमिन डी देते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. जेव्हा हाडे मजबूत होतील, तेव्हाच उंचीचा योग्य विकास होईल. म्हणूनच, मुलांना फक्त घरातच ठेवू नका, त्यांना मोकळ्या जागेत खेळण्यासाठी नक्की वेळ द्या.4 / 9 मुलांची वाढ त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीवरही अवलंबून असते. यासाठीच त्यांना सकस आहार देणे गरजेचे आहे. रोजच्या जेवणात दूध, दही, डाळ, फळे, हिरव्या भाज्या आणि पनीर यांसारख्या पोषक घटकांचा समावेश नक्की करा. हे सर्व पदार्थ शरीराला आवश्यक प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे देतात. बाहेरच्या जंक फूडऐवजी घरचे साधे आणि संतुलित जेवण मुलांच्या विकासासाठी जास्त फायदेशीर ठरते.5 / 9 मुलांसाठी चांगली आणि पुरेशी झोप खूप आवश्यक आहे. जेव्हा मूल गाढ झोपेत असते, तेव्हा त्याच्या शरीरात ग्रोथ हार्मोन तयार होतो, जो उंची वाढवण्यास मदत करतो. म्हणूनच मुलांच्या झोपेची वेळ निश्चित करा आणि त्यांना दररोज ८ ते १० तास झोप घेऊ द्या.6 / 9 शारीरिक हालचाली देखील मुलांची उंची वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. धावणे, उड्या मारणे, खेळणे किंवा दोरीवरच्या उड्या मारणे अशा क्रियांमुळे शरीर स्ट्रेच होते आणि स्नायू मजबूत होतात. मुलांना दिवसातला काही वेळ 'आउटडोअर गेम्स'साठी नक्की द्या, जेणेकरून त्यांचे शरीर ॲक्टिव्ह राहील आणि त्यांची निरोगी वाढ होईल.7 / 9आजकाल मुले मोबाईल आणि टीव्हीवर जास्त वेळ घालवत आहेत, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली कमी होत आहेत. मुलांची ही सवय त्यांच्या वाढीवर परिणाम करू शकते. त्यामुळे मुलांच्या स्क्रीन टाइमची मर्यादा निश्चित करा आणि त्यांना बाहेर खेळण्यासाठी किंवा कोणत्याही कामात गुंतवून ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करावा. 8 / 9शरीराचा योग्य विकास तेव्हाच होतो जेव्हा शरीर आतून 'हायड्रेटेड' राहील. यासाठीच, मुलांना दिवसभरात पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा. पाणी शरीरातील सर्व गरजेच्या प्रक्रिया सुरळीत चालवण्यास मदत करते, ज्यामुळे मुलांची वाढ अधिक चांगली होते.9 / 9 मुलांची वाढ घरातील वातावरणावरही अवलंबून असते. जर मूल आनंदी आणि तणावमुक्त असेल, तर त्याचा विकास चांगल्या प्रकारे होतो. म्हणूनच घरचे वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा, मुलांशी प्रेमाने बोला आणि त्यांना सुरक्षित वाटेल याची काळजी घ्या.