Join us

आईबाबा, फटाक्यांशिवायही ‘अशी’ दणक्यात साजरी करा मुलांची दिवाळी, पाहा ६ भन्नाट आयडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2025 10:00 IST

1 / 8
'दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा' असं आपण नेहमी म्हणतोच... आत्तापर्यंत घरांतील बच्चे कंपनीच्या शाळांना दिवाळीची सुट्टी पडली असेल. दिवाळीची सुट्टी म्हणजे मुलांसाठी आनंदाचा काळ... दिवाळीची सुट्टी (diwali celebration ideas for kids without crackers) मुलांसाठी खास असते कारण अभ्यासाला बुट्टी मारुन नुसतं दंगा, मस्ती, खेळ, फराळ आणि फटाके फोडण्याचा आनंद इतकीच काय ती धमाल... पण फटाक्यांमुळे होणारा आवाज आणि प्रदूषण हे पर्यावरण आणि मुलांच्या आरोग्यासाठी योग्य नाही.
2 / 8
फटाके न फोडताही तुम्ही मुलांची दिवाळी खूप मजेशीर आणि (eco friendly diwali ideas for children) आनंदी करु शकता. मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, अ‍ॅक्टिव्हिटी किंवा इतर काही आवडते छंद जोपासायला मदत नि प्रोत्साहित करुन फटाक्यांशिवायही तुम्ही त्यांच्यासोबत ही दिवाळी साजरी करु शकता. असे काही मजेशीर फन आयडियाज पाहूयात ज्यामुळे मुलांची दिवाळी होईल अधिक रंगतदार आणि कायम आठवणीत राहील अशी होईल.
3 / 8
१. फटाक्यांऐवजी मुलांसाठी घरीच एक छोटेसे दिवाळी फेअर आयोजित करा. यात तुम्ही रिंग टॉस, बलून शूटिंग किंवा चॉकलेट हंट यांसारखे वेगवेगळे गेम्स ठेवू शकता. मुलांना देखील आपापल्या मित्र - मैत्रिणीसोबत हा खेळ खेळायला नक्कीच आवडेल.
4 / 8
२. मुलांना रंगीत कागद, ग्लिटर आणि पणत्या किंवा घर साजवटीचे काम करु द्या. त्यांच्याकडून कागदी कंदील बनवून घ्या, पणत्या रंगवून घ्या किंवा तोरण तयार करून घ्या. ते स्वतः सजावटीत सामील झाल्यावर त्यांचा सणाशी असलेला संबंध अधिक वाढेल.
5 / 8
३. मुलांना किचनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करू द्या. त्यांना फराळ करण्यात मदत करायला सांगा जसे की, बेसन लाडू वळणे किंवा चॉकलेट बर्फी तयार करणे यासारखी सोपी कामे करू द्या. यामुळे त्यांना सणाचा खरा आनंद मिळेल आणि त्यांनी स्वतः तयार केलेल्या गोड पदार्थांची मजा अजून चांगल्या प्रकारे घेता येईल.
6 / 8
४. रात्री कुटुंबासोबत मज्जा - मस्ती करत गोष्टी सांगण्याचे व ऐकण्याचे एक सेशन ठेवा. यासोबतच मुलांना त्यांच्या आवडत्या गाण्यांवर डान्स करू द्या. यामुळे मनोरंजन तर होईलच, सोबतच मुलांना कुटुंबासोबतच वेळ घालवण्याचा आनंद मिळेल.
7 / 8
५. मुलांना नाचणे, गाणे, कविता म्हणणे किंवा एखादी मजेशीर गोष्ट सांगण्याची संधी द्या. विजेत्यांसाठी छोटे बक्षीस ठेवा. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
8 / 8
६. कौटुंबिक खेळ जसे की कॅरम, पत्ते, ल्युडो, सापशिडी किंवा 'ट्रेझर हंट' अशा खेळांचे आयोजन करा. यामुळे मुलांना कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल.
टॅग्स : पालकत्वलहान मुलंदिवाळी २०२५