1 / 8मुलांचे संगोपन करणे हे एक खूप जबाबदारीचे काम आहे. पण जर घरात वयस्कर (children raised with grandparents) आजी - आजोबा असतील, तर हे काम थोडे सोपे होते. मुलांची काळजी कशी घ्यावी? त्यांच्यासोबत कसे वागावे? त्यांना कसे आनंदी ठेवावे? त्यांना योग्य वळण कसे लावावे, या सर्व गोष्टींचा अनुभव आजी - आजोबांना असतो.2 / 8विशेषतः ज्या घरांमध्ये आई-वडील दोघेही कामासाठी बाहेर जातात, तिथे आजी, आजोबाच मुलांची देखभाल करतात. त्यांचे आई-वडील घरी परत येईपर्यंत मुलं आजी - आजोबांच्याच सहवासात असते. आजी - आजोबांसारख्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सहवासातं राहिल्याने मुलांच्या विचारात आणि विकासात अनेक चांगले गुण दिसून येतात ते कोणते ते पहा... 3 / 8आजी-आजोबांसोबत वेळ घालवणे म्हणजे त्यांच्या अनुभवांतून धडे घेणे. आयुष्यात आलेल्या अडचणी, कठीण काळ, आनंद, प्रेम आणि त्यांनी दाखवलेला अथक संयम यांसारख्या भावनांनी जीवन कसे जगायचे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजी - आजोबा असतात. अशा सकारात्मक आणि अनुभवी वातावरणात वाढलेल्या मुलांमध्ये मानसिक गुणांचा विकास होतो. ते भावनिकदृष्ट्या स्थिर राहतात आणि त्यांना जीवनातील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याचे बळ मिळते.4 / 8 आजी-आजोबांनी त्यांच्या जन्मापासून आजपर्यंत जे जग पाहिले आहे, ते खूप वेगळे आहे. ते या बदलांना कसे सामोरे गेले? त्यांनी आयुष्यात प्रगती कशी केली? हे सर्व लहानपणापासूनच मुलांना सांगितले जाते. या कथांच्या माध्यमातून मुले जीवनाकडे फक्त एका साध्या दृष्टिकोनातून न पाहता, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकतात. त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात. यामुळे मुलांमध्ये समजून घेणे आणि समस्या सोडवणे यांसारखी महत्त्वाची कौशल्ये विकसित होतात.5 / 8आजकाल जेव्हा आई-वडील आपापल्या कामात व्यस्त असतात, तेव्हा आजी-आजोबा आपल्या मुलांना निस्वार्थ प्रेम देतात.त्यांच्या संयम आणि सहनशीलतेमुळे मुलांना कोणत्याही प्रकारचा तणाव सहन करण्याची शक्ती मिळते. मुलांना जेवण भरवणे, गोष्टी सांगणे आणि गाणी गाणे यांसारख्या छोट्या-छोट्या कामांमुळे मुले शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहतात. हे प्रेमळ वातावरण मुलांना सुरक्षिततेची भावना देते. हे त्यांच्या आत्मविश्वासासाठी खूप चांगले आहे.6 / 8मुलांना त्यांच्या आजी-आजोबांकडून मिळणारा सर्वात मोठा वारसा म्हणजे संस्कृती. घरातील वडीलधाऱ्यांच्या दैनंदिन चालीरीती आणि रीतिरिवाज पाहून, मुलांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दलची आवड निर्माण होते. ते नम्रतेने बोलणे आणि मोठ्यांचा आदर करणे यांसारख्या गोष्टी शिकतात. या गोष्टी मुलांच्या वर्तनावर सकारात्मक परिणाम करतात. यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यास मदत होते.7 / 8वडीलधाऱ्यांसोबत जास्त वेळ घालवल्याने मुलांना सामाजिक कौशल्ये विकसित करण्यातही मदत मिळते. मुले लक्षपूर्वक ऐकणे, योग्य प्रश्न विचारणे आणि योग्य वेळी उचित उत्तर देणे यांसारख्या गोष्टी शिकतात. ही कौशल्ये भविष्यात त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उपयुक्त ठरतील.8 / 8आजी-आजोबांसोबत मोठे होणारे मुल फक्त प्रेमळ वातावरणात वाढत नाहीत, तर त्यांच्यात मानवता, ज्ञान, धैर्य आणि नैतिकता यांसारखी मूल्ये देखील विकसित होतात. यामुळे ते जास्त जबाबदार आणि समाजाबद्दल अधिक समजूतदार बनतात. म्हणूनच, आजी-आजोबांसोबत वाढलेली मुले खास असतात. आजी-आजोबांसोबत सहवासात घालवलेले बालपण हे एका वरदानासारखे असते. जर हा अनुभव मुलांना देता आला, तर तो त्यांच्या आयुष्यातील एक सर्वात मोठा आणि अमूल्य ठेवा असतो.