मुलांना खाऊ घाला कॅल्शियमचा पॉवर डोस असलेले ७ पदार्थ, गुटगुटीत होतील-हाडं बळकट
Updated:February 28, 2026 15:49 IST2026-02-27T20:28:35+5:302026-02-28T15:49:26+5:30
Calcium Rich Foods For Kids : संत्री केळी, पेरू या फळांमधूनही भरपूर कॅल्शियम मिळते आणि व्हिटामीन्सही मिळतात.

लहान मुलांच्या हाडांच्या मजबूतीसाठी आणि वाढीसाठी कॅल्शियमयुक्त आहार खूपच महत्वाचा असतो. मुलांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास त्याच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघेल.
पालक, मेथी आणि शेवग्याची पानं यांचा आहारात समावेश करा. शेवग्याच्या शेंगांचे सूप प्यायल्यानं हाडं बळकट होतात तसंच मुलांना शारीरिक विकास व्यवस्थित होतो.
दूध, दही, पनीर आणि ताक हे कॅल्शियमचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत.यात कॅल्शियमसोबत व्हिटामीन के सुद्धा असते.
तीळ
तीळ हे कॅल्शियमचा पॉवरहाऊस आहेत. बदामाची पूड दुधात घालून किंवा गुळासोबत तिळाचे लाडू करून दिल्यास ते अधिक पोषक ठरतात.
नाचणी
नाचणी हे कॅल्शियमचा अत्यंत उत्तम आणि नैसर्गिक स्त्रोत आहे. त्याची लापशी किंवा डोसा मुलांना देता येतो.
संत्री केळी, पेरू या फळांमधूनही भरपूर कॅल्शियम मिळते आणि व्हिटामीन्सही मिळतात.
नाचणीच्या पिठाचे पदार्थ, कडधान्य, ड्रायफ्रुट्स आणि सोयाबीनचा आहारात समावेश करावा.
शरीराला कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटामीन डी ची गरज असते. त्यामुळे मुलांना थोडा वेळ सकाळ्याच्या कोवळ्या उन्हात खेळू द्या.