तल्लख बुद्धीसाठी मुलांना खायला द्या ५ पदार्थ खा; स्मार्ट होतील मुलं- स्मरणशक्तीही वाढेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 16:38 IST
1 / 7मुलांनी लहानपणापासूनच चांगला आहार घेतला तर त्याचे आरोग्य चांगले राहते आणि कोणत्याही आरोग्याच्या समस्याही उद्भवत नाही. लहानपणी मुलांची ग्रास्पींग पॉवर खूप चांगली असते. लहानपणी मुलं ज्या काही गोष्टी करतात, ज्या वातावरणात वाढतात ते नेहमीच लक्षात ठेवतात. रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास मुलांची स्मरणशक्ती चांगली राहण्यास मदत होईल.2 / 7दही मेंदूच्या वाढीसाठी मदत करते. यात प्रथिने, कोलिन आणि आयोडीन यांसारखी पोषक तत्व असतात. त्यामुळे तब्येतीच्या समस्या उद्भवत नाहीत. 3 / 7 ताज्या भाज्या व्हिटामीन आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करायलाच हवे. पालक, फ्लॉवर, ब्रोकोली, पनीर, शिमला मिरची, गारज, बीट अशा पदार्थांच्या मुलांच्या आहारात समावेश असावा.4 / 7दूध हे मुख्य अन्न आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे डोकं तीक्ष्ण बनवायचे असेल तर त्याला नक्कीच दूध द्या. दुधात कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे आढळतात ज्यामुळे वाढ होण्यास मदत होते. फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी दुधामध्ये आढळतात, ज्यामुळे हाडे, नखे आणि दात निरोगी राहतात.5 / 7केळी खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते आणि हे लहान मुलांचे आवडते फळ आहे. केळी खाल्ल्याने व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर मिळतात, जे मुलाच्या विकासात मदत करतात.6 / 7सुरुवातीपासूनच मुलांना सुका मेवा खाण्याची सवय लावा. विशेषतः भिजवलेले बदाम, अक्रोड आणि मनुका मुलांना रोज खायला द्या. यामुळे मुलाचे मन शांत होईल आणि शारीरिक विकासासही मदत होईल.7 / 7ओट्स, गाजर, नट्स बटर, फळं, बिया, चपाती, डाळींचे पदार्थ, भाज्यांचे सॅण्डविच हे पदार्थ मुलांना खायला देऊ शकता.