1 / 8मुलांना चांगल्या संस्कारात वाढवणं हे आई-वडीलांसाठी एखाद्या मोठ्या टास्कप्रमाणे असते. अनेकदा पालक मुलांकडे लक्ष देण्यात कमी पडतात. करीअर आणि इतर गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे त्यांना मुलांकडे फार लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. काही चुका टाळल्याने मुलांचे भवितव्य चांगले राहील आणि मुलांवर संस्कारही चांगले होतील.2 / 8शिस्तीचा अभाव- मुलांना लहानपणापासूनच चांगली शिस्त लावा. मुलांना घरापासूनच शिस्त लावल्याने ते चांगले राहतील. 3 / 8मुलांकडे दुर्लक्ष - ठराविक वयापर्यंत मुलांकडे लक्ष देणं नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मुलांचे वागणे बदलत असेल तर त्याकडे लक्ष द्या. 4 / 8मुलांना योग्य शिक्षण द्या त्यांना इतरांना मान देणं, मोठ्यांबरोबरच लहानांचाही आदर करायला शिकवा. कारण अनेकदा मुलं सेल्फ सेंटरर्ड होतात.5 / 8मुलांना कळायला लागतं तेव्हापासून त्यांना आपल्या जबाबदाऱ्या शिकवायला हव्यात. अन्यथा त्यांना जबाबदारीची जाणिव होणार नाही. 6 / 8मुलांना कायम इतरांशी स्पर्धा करण्याची शिकवणं देऊ नका. ज्यामुळे मुलांवर दडपण येऊ शकतं. अशा वातावरणामुळे मुलं स्वार्थी होऊ शकता. 7 / 8मुलांना त्यांच्या वयानुसार जबाबदाऱ्या न देणं किंवा छोटयाच छोटं काम करण्यापासून अडवणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. 8 / 8पालक मुलांचे रोल मॉडेल असतात. म्हणूनच मुलांशी वागताना पालकांनी समजून वागायला हवं. अनेकदा पालकांचे अनुकरण मुलं करतात, त्यामुळे पालकांनी चुकीचे वागू नये.