मुलांचा मेंदू धावेल AI पेक्षा सुपरफास्ट! आहारात करा 'हे' ७ बदल; बुद्धी होईल तल्लख
Updated:March 2, 2026 11:52 IST2026-03-01T19:00:00+5:302026-03-02T11:52:17+5:30
Brain boosting foods for kids: Improve child intelligence: Kids brain development: पालकांनी मुलांच्या आहारात कोणते बदल करायला हवे पाहूया.

सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक पालकाला वाटते की आपल्या मुलाने अभ्यासात पुढे जावे. अनेकदा मुले अभ्यासात मागे पडतात किंवा त्यांची एकाग्रता कमी होते. अशा वेळी आपण त्यांना दोष देतो. संशोधनानुसार मुलांच्या बुद्धिमत्तेचा आणि त्यांच्या आहाराचा जवळचा संबंध असतो. मुलांचा मेंदू सुपरफास्ट चालण्यासाठी त्यांना योग्य 'ब्रेन फूड'ची गरज असते. (Brain boosting foods for kids)
मुलांच्या वाढत्या वयात त्यांच्या मेंदूच्या पेशींचा विकास वेगाने होत असतो. अशा वेळी जर त्यांच्या आहारात योग्य पोषक घटकांचा समावेश केला, तर त्यांची स्मरणशक्ती, तर्कशक्ती आणि एकाग्रता कमालीची वाढू शकते. यासाठी पालकांनी मुलांच्या आहारात कोणते बदल करायला हवे पाहूया. (Improve child intelligence)
मुलांच्या आहारात ओमेगा - ३ युक्त पदार्थांचा समावेश करा. आपण रोज सकाळी मुलांना अक्रोड खाऊ घालू शकतो. ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात, जे मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात. रोज सकाळी भिजवलेले ५ बदाम आणि २ अक्रोड खाल्ल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते.
पालेभाज्यांमध्ये लोह आणि फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात असते. मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळण्यासाठी रक्तातील लोहाचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. ज्या मुलांच्या आहारात पालेभाज्या असतात, त्यांची शिकण्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त असते.
अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये कोलीन नावाचे पोषक तत्व असते. हे खाल्ल्याने स्मरणशक्ती विकसित होते. वाढत्या वयातील मुलांना रोज एक अंडे दिल्यास त्यांचा मेंदू अधिक वेगाने चालतो.
स्ट्रॉबेरी, जांभूळ किंवा संत्री यांसारख्या फळांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. हे मेंदूतील तणाव कमी करून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवतात.
मेंदूला सतत ऊर्जेची गरज असते. नाचणी, बाजरी किंवा ओट्स यांसारख्या पदार्थांमधून ग्लुकोज हळूहळू शरीरात सोडले जाते, ज्यामुळे मुलांना अभ्यासात बराच वेळ एनर्जी मिळते आणि त्यांना थकवा जाणवत नाही.
डार्क चॉकलेटमध्ये कोको असतो, जो मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो. परीक्षेच्या काळात किंवा कठीण विषय सोडवताना डार्क चॉकलेटचा छोटा तुकडा खाल्ल्याने मुलांचा मूड सुधारतो आणि एकाग्रता वाढते.
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास मुले चिडचिडी होतात, त्यांना सुस्ती येते. त्यामुळे दिवसभरात मुलांनी किमान ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.