Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मुलांच्या तब्येतीची खरंच काळजी असेल तर त्यांना चुकूनही खाऊ घालू नका ‘हे’ ५ पदार्थ, लिव्हर- किडनी खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2026 17:21 IST

1 / 7
हल्लीची मुलं अगदी सर्रास जे काही पदार्थ खातात ते पदार्थ त्यांच्या आरोग्यावर खूपच वाईट परिणाम करतात.
2 / 7
त्या पदार्थांमुळे लिव्हर, किडनी खराब होणे तसेच मधुमेह टाईप १ होण्याचा धोकाही वाढतो. म्हणूनच कोणते पदार्थ मुलांना अजिबात खायला देऊ नयेत, याची माहिती डॉक्टरांनी getfitwith_drchetana या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहे.(avoid giving these 5 foods to your kids)
3 / 7
त्यातला पहिला पदार्थ आहे पॅकबंद मिळणारी कोणतीही पेयं. एनर्जी ड्रिंक किंवा अन्य काही नावाने ती विकली जातात. पण त्या पदार्थांचा वाईट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. कारण त्या पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात साखर, केमिकल्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात. त्यामुळे मुलाना टाईप १ मधुमेह होण्याचा धोका वाढतो.(5 foods that are harmful for kids health)
4 / 7
दुसरा पदार्थ म्हणजे चिप्स, कुरकरे असे पदार्थ. या पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ असते. त्यामुळे ते शरीरात अतिरिक्त पाणी धरून ठेवतात. यामुळे मुलांना स्थुलता तर येतेच, पण त्याचा किडनीवरही वाईट परिणाम होतो.
5 / 7
तिसरा पदार्थ आहे चॉकलेट्स, कॅडबरी, केक, पेस्ट्री असे गोड पदार्थ. या गोड पदार्थांमधून मुलांना कोणतेही पोषण मिळत नाही. उलट त्यांच्यामध्ये असणाऱ्या अतिरिक्त साखरेचा मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत जातो.
6 / 7
मुलांना मैदायुक्त पदार्थ देणेही पुर्णपणे टाळायला हवं. मैदा पचायला खूप जड असतो. त्यामुळे मुलांची पचनक्रिया त्यामुळे खराब होते. म्हणूनच पिझ्झा, बर्गर, बिस्किटे, ब्रेड असे मैदायुक्त पदार्थ टाळायला हवे.
7 / 7
हल्ली फ्रेंच फ्राईज खाण्याचे मुलांमध्ये प्रचंड वेड आहे. रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी तेच मागवले जाते. त्यासाठी वापरण्यात आलेलं तेल कोणत्या प्रकारचं आहे हे आपल्याला माहिती नसतं. एकच तेल वारंवार गरम करून त्यात ते तळले जातात. त्यामुळे तेलामध्ये कित्येक विषारी घटक तयार होतात. ते हृदयावरही वाईट परिणाम करणारे ठरतात.
टॅग्स : पालकत्वलहान मुलंअन्न