By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:51 IST
1 / 8एकदा, दोनदा सांगून ऐकलं नाही तर बरेचजण मुलांवर हात उचलतात. त्यांना शारिरिक शिक्षा देणं. त्यांच्या वाढीवर अत्यंत नकारात्मक परिणाम करते. (The Negative Impact OF Physical Punishment Of Children)2 / 8मुलांना मारल्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण होते. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. (Parenting Tips)3 / 8 जी मुलं सतत मार खातात ती पुढे जाऊन अधिक हट्टी किंवा हिंसक बनवण्याची शक्यता असते.4 / 8 पालकांनी हात उचलल्यामुळे मुलांच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर कमी होऊन भिती आणि राग निर्माण होतो. ज्यामुळे नात्यात दुरावा येतो.5 / 8चुकांवरून मार मिळाल्यास मुलं नवीन गोष्टी शिकायला घाबरतात आणि चुका लपवण्यासाठी खोटं बोलतात.6 / 8मारल्यामुळे मुलांना आपण सुरक्षित नाही आहोत असं वाटू शकतं. ज्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावरच होतो.7 / 8समस्या सोडवण्यासाठी हिंसा हाच मार्ग आहे असा चुकीचा संदेश मुलांपर्यंत पोहोचतो.8 / 8शिस्त लावण्यासाठी मारहाणीपेक्षा संवाद आणि प्रेमाचा आधार घेणं केव्हाही चांगलं मारल्यामुळे मुलं सुधारण्याऐवजी अधिक बंडखोर होतात