मुलांच्या स्टडी टेबलवर चुकूनही ठेवू नयेत ६ गोष्टी! अभ्यासातून लक्ष होईल विचलित - मुलं अभ्यासाचा करतील कंटाळा...

Updated:October 5, 2025 14:02 IST2025-10-01T18:47:01+5:302025-10-05T14:02:30+5:30

things to remove from study table for focus : 6 things you should never put on your children's study table : मुलांच्या स्टडी टेबलवर चुकूनही न ठेवता येणाऱ्या आणि लक्ष विचलित करणाऱ्या वस्तू कोणत्या ते पाहा...

मुलांच्या स्टडी टेबलवर चुकूनही ठेवू नयेत ६ गोष्टी! अभ्यासातून लक्ष होईल विचलित - मुलं अभ्यासाचा करतील कंटाळा...

अभ्यास करताना मुलांचं लक्ष एकाग्र राहणं खूप महत्त्वाचं असतं. पण (6 things you should never put on your children's study table) स्टडी टेबलवर ठेवलेल्या काही वस्तू नकळत त्यांचं लक्ष विचलित करतात आणि अभ्यासाची गती कमी होते. म्हणूनच मुलांच्या अभ्यासासाठी योग्य वातावरण तयार करताना स्टडी टेबलवर कोणत्या वस्तू ठेवू नयेत हे जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे.

मुलांच्या स्टडी टेबलवर चुकूनही ठेवू नयेत ६ गोष्टी! अभ्यासातून लक्ष होईल विचलित - मुलं अभ्यासाचा करतील कंटाळा...

जर मुलांच्या स्टडी टेबलवर काही चुकीच्या वस्तू असतील, तर त्या सहजपणे (things to remove from study table for focus) त्यांचे लक्ष विचलित करू शकतात, ज्यामुळे मुलांच्या अभ्यासाचा वेळ वाया जातो. मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी, त्यांच्या स्टडी टेबलवर चुकूनही न ठेवता येणाऱ्या आणि लक्ष विचलित करणाऱ्या अशा कोणत्या वस्तू आहेत ते पाहूयात.

मुलांच्या स्टडी टेबलवर चुकूनही ठेवू नयेत ६ गोष्टी! अभ्यासातून लक्ष होईल विचलित - मुलं अभ्यासाचा करतील कंटाळा...

मोबाईल फोन हे लक्ष विचलित होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. सतत येणारे नोटिफिकेशन्स किंवा 'एकदा चेक करून बघू' ही ओढ मुलांचे अभ्यासातील लक्ष पूर्णपणे काढून टाकते. यासाठी, फोन आणि टॅबलेट अभ्यासाच्या वेळेत दुसऱ्या खोलीत किंवा सायलेंट मोडवर दूर ठेवा.

मुलांच्या स्टडी टेबलवर चुकूनही ठेवू नयेत ६ गोष्टी! अभ्यासातून लक्ष होईल विचलित - मुलं अभ्यासाचा करतील कंटाळा...

स्टडी टेबलवर ठेवलेले कोणतेही खेळणे, पझल्स, किंवा स्ट्रेस बॉल, व्हिडिओ गेम्स मुलांचे लक्ष लगेच वेधून घेतात. त्यांना अभ्यास कंटाळवाणा वाटू लागला की लगेच त्यांचे खेळण्याकडे मन वळते. स्टडी टेबल फक्त अभ्यासासाठीच वापरा.

मुलांच्या स्टडी टेबलवर चुकूनही ठेवू नयेत ६ गोष्टी! अभ्यासातून लक्ष होईल विचलित - मुलं अभ्यासाचा करतील कंटाळा...

खूप जास्त रंगांचे हायलाइटर्स, अनेक रंगांचे पेन्स, किंवा स्टीकर्स असलेले पेन स्टँड मुलांचे लक्ष अभ्यासातून काढून त्या वस्तूंवर केंद्रित करते.

मुलांच्या स्टडी टेबलवर चुकूनही ठेवू नयेत ६ गोष्टी! अभ्यासातून लक्ष होईल विचलित - मुलं अभ्यासाचा करतील कंटाळा...

जर मुलांच्या स्टडी टेबलवर जोक्स किंवा मजेदार गोष्टींची पुस्तके ठेवलेली असतील, तर ती देखील टेबलवरून उचलून कपाटात किंवा दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकता. मुलं अभ्यास करण्याऐवजी जोक्स किंवा गोष्टींची पुस्तके वाचू लागेल आणि यामुळे त्याच्या शालेय अभ्यासात अडथळा निर्माण होईल.

मुलांच्या स्टडी टेबलवर चुकूनही ठेवू नयेत ६ गोष्टी! अभ्यासातून लक्ष होईल विचलित - मुलं अभ्यासाचा करतील कंटाळा...

स्टडी टेबलवर खाण्याचे पदार्थ ठेवल्यास, मुलं प्रत्येक लहान ब्रेकमध्ये किंवा कंटाळा आला म्हणून खाऊ लागतात. यामुळे वारंवार ब्रेक घेण्याची सवय लागते आणि टेबल अस्वच्छ होते. परंतु आपण पाणी किंवा एखादे फळ मुलांच्या जवळ ठेवू शकतो.

मुलांच्या स्टडी टेबलवर चुकूनही ठेवू नयेत ६ गोष्टी! अभ्यासातून लक्ष होईल विचलित - मुलं अभ्यासाचा करतील कंटाळा...

स्टडी टेबलवर आरसा किंवा स्वतःचे/मित्रांचे जास्त फोटो ठेवल्यास, मुले वारंवार स्वतःला पाहू लागतात किंवा जुन्या आठवणींमध्ये रमतात. टेबलवर कोणतेही व्यक्तिगत फोटो किंवा आरसा ठेवू नका. स्टडी एरिया शक्यतो शांत आणि साधासुधा ठेवा.