Join us

मुलं होतील एकपाठी, वाचलेलं सगळंच राहील लक्षात! ६ पदार्थ खाऊ घाला- स्मरणशक्ती खूप वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2025 14:26 IST

1 / 8
काही पदार्थ असे आहेत जे नियमितपणे खाल्ल्यास मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतात. (6 Indian food that helps to boost memory and improve concentration)
2 / 8
हल्ली अल्झायमरचा त्रासही खूप वाढला आहे. किंवा कित्येक गोष्टी आपण चटकन विसरून जातो. असा विसराळूपणा कमी करण्यासाठीही काही पदार्थ उपयुक्त ठरतात. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया..(how to boost memory and improve concentration of kids?)
3 / 8
सगळ्यात पहिला पदार्थ आहे बदाम. बदामामधून व्हिटॅमिन ई, ओमेगा ३ फॅटी ॲसिड, ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे स्ट्रेस कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
4 / 8
स्मरणशक्ती वाढविणारा दुसरा पदार्थ आहे अक्रोड. त्यामध्येही ओमेगा ३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात. एकाग्रता वाढण्यासाठीही अक्रोड उपयोगी ठरतात.
5 / 8
ॲण्टी इंन्फ्लामेटरी गुणधर्म आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असणारी हळद स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते.
6 / 8
घरी तयार केलेले साजुक तूप नियमितपणे खाल्ल्यास neurotransmitter function सुधारण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात १ चमचा साजुक तूप तरी असायलाच हवे.
7 / 8
ॲण्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात देणारा आवळा मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी मदत करतो.
8 / 8
फोलेट, व्हिटॅमिन के आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात देणाऱ्या हिरव्या पालेभाज्याही विसराळूपणा कमी करण्यास मदत करतात.
टॅग्स : पालकत्वलहान मुलंअन्न