मुलांची उंची वाढतं नाही, आईबाबांच्या डोक्याला टेंन्शन! खाऊ घाला ५ पदार्थ - बघता बघता उंची वाढेल भरभर...
Updated:August 17, 2025 06:05 IST2025-08-17T06:00:00+5:302025-08-17T06:05:01+5:30
Tips To Increase Kids Height Fast & Naturally : 5 Superfoods That Help Increase Childrens Height : superfoods for kids height growth : best foods to increase children’s height : height increasing foods for kids : मुलांची उंची वाढवण्यासाठी खायला द्या ५ पदार्थ - उंची वाढेल दुप्पट वेगाने...

आजकालच्या मुलांमध्ये एक फारच कॉमन समस्या दिसून येते ती म्हणजे त्यांची (5 Superfoods That Help Increase Childrens Height) उंची न वाढणे. यामुळे पालक सर्वात जास्त चिंतेत असतात. परंतु, मुलांची योग्य वाढ व्हावी यासाठी त्यांच्या आहाराची देखील तितकीच विशेष काळजी घेणे गरजेचे असते. साधारणपणे काही मुलांची उंची खूप लवकर वाढते, तर काही मुलांना थोडा अधिक वेळ लागतो.
मुलांच्या आहारात पोषक तत्त्वांची कमतरता असू शकते, यामुळे देखील (best foods to increase children’s height) त्यांच्या वाढीत आणि विकासात अडथळा येत असेल. मुलांची उंची वाढावावी यासाठी अनेक पालक यासाठी वेगवेगळे उपाय करतात, तरीही अनेकदा त्या उपायांचा काहीच परिणाम होताना दिसत नाही. काहीवेळा अनुवांशिक कारणांमुळेही मुलांची उंची कमी राहते. त्यामुळे मुलांनी आणि टीनएजर्सनी आहार आणि लाईफस्टाईलकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.
काही अन्नपदार्थ असे आहेत जे मुलांची उंची वाढवण्यास मदत (height increasing foods for kids) करू शकतात, असे पदार्थ कोणते ते पाहा...
१. दूध :-
मुलांची उंची वाढवण्यासाठी दूध महत्वांच्या अन्नपदार्थांपैकी एक आहे. दुधामध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. जर मूल रोज दूध पीत असेल, तर यामुळे केवळ त्यांची हाडंच मजबूत होत नाहीत, तर त्यांची उंचीही भराभर वाढते. तुम्ही मुलांना वेगवेगळ्या फ्लेवर्सचे देखील दूध देऊ शकता.
२. हिरव्या पालेभाज्या :-
पालक आणि मेथीसारख्या हिरव्या पालेभाज्या मुलांची उंची वाढवण्यासाठी उपयुक्त मानल्या जातात. कारण या भाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. या पालेभाज्या हाडांच्या वाढीस आणि मजबूतीस मदत करतात.
३. सोयाबीन :-
सोयाबीनमध्ये प्रोटीन फार मोठ्या प्रमाणात असते, जे हाडे आणि स्नायूंच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते. यामध्ये असलेले अमिनो ॲसिड हाडांना मजबूत करतात आणि शरीरातील टिश्यूंची दुरुस्ती करतात. नियमित आहारात सोयाबीनचा समावेश केल्यास मुलांची उंची वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच सोयाबीनमध्ये कॅल्शियम, लोह आणि इतर आवश्यक खनिजेही असतात, जी एकूणच मुलांची वाढ आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
४. टोफू :-
टोफूमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते, जे मुलांची हाडे मजबूत करण्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक असते. सोयाबीन प्रमाणेच टोफूमध्ये देखील सर्व आवश्यक घटक व अमिनो ॲसिड असतात, जे शरीराच्या टिश्यूंची दुरुस्ती आणि स्नायूंच्या विकासासाठी मदत करतात. नियमित आहारात टोफूचा समावेश केल्यास मुलांची उंची वाढण्यास आणि एकूणच शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
५. ड्रायफ्रुटस :-
बदाम, अक्रोड आणि जवसाच्या बियांसारखे ड्रायफ्रुटस मुलांना खायला नक्की द्या. यांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, झिंक आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. ही पोषक तत्त्व लहान मुलांची हाडे मजबूत करण्यास, मेंदूच्या विकासास आणि एकूणच शारीरिक वाढीस मदत करतात.