मुलांना खाऊ घाला ५ पदार्थ -स्मरणशक्ती वाढेल आणि वाचलेलं सगळं नीट लक्षातही राहील!
Updated:July 29, 2025 18:00 IST2025-07-29T16:20:13+5:302025-07-29T18:00:26+5:30

मुलांची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर काही पदार्थ त्यांना रोजच्या रोज खाऊ घाला, असं तज्ज्ञ सांगत आहेत.
त्यापैकी पहिला पदार्थ आहे अक्रोड. रात्रभर पाण्यात भिजवलेले अक्रोड दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना खाऊ घाला. यामुळे मुलांना ओमेगा ३ मिळते आणि स्मरणशक्ती तसेच एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते.
दुसरा पदार्थ आहे जवस. ओमेगा आणि डीएचए त्यामध्ये भरपूर प्रमाणात असते.
मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यासाठी चिया सीड्स खाणेही खूप उपयुक्त ठरते.
बदाम आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बिया म्हणजेच भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया मुलांना नियमितपणे खायला द्यावे.
मुग डाळ, राजमा, हरबरे असे भरपूर प्रोटीन्स आणि लोह असणारे पदार्थही मुलांच्या बौद्धिक विकासासाठी उपयुक्त ठरतात.