Join us

मुलं ठेंगणी राहू नयेत म्हणून 'या' वयात त्यांची काळजी घ्या, मुलांची उंची भराभर वाढण्यासाठी ४ टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2025 13:30 IST

1 / 6
ज्या व्यक्ती छान उंचपुऱ्या असतात त्यांची समोरच्या व्यक्तीवर वेगळीच छाप पडते. त्यामुळे आपली मुलंही छान उंचपुरी व्हावीत असं पालकांना वाटणं साहजिक आहे.(4 Simple Ways to Increase Height in Children)
2 / 6
उंची वाढणं हे अनुवंशिक आहे, असं समजून कित्येक पालक मुलांच्या उंचीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसत नाहीत. पण इथेच नेमकं चुकतं. जर मुलांची उंची वाढण्यासाठी योग्य वयात योग्य प्रयत्न केले तर नक्कीच मुलांची उंची वाढू शकते. त्यासाठी काय करावे याविषयीची माहिती डॉक्टरांनी dr_himanshumehta या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(4 tips for increasing height of kids)
3 / 6
डॉक्टर सांगतात की मुलींसाठी १० ते १४ आणि मुलांसाठी १२ ते १६ हे वय वयात येण्याचं असतं. या वयात जर मुलांच्या काही गोष्टी सांभाळल्या तर नक्कीच त्यांची उंची वाढू शकते. यातली पहिली गोष्ट म्हणजे मुलांच्या आहारात प्रोटीन्स वाढविणे. त्यामुळे योग्य ते पोषण मिळून मुलांची उंची वाढण्यास मदत होते.
4 / 6
प्रोटीन्ससोबतच मुलांच्या आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ही योग्य प्रमाणात असायला हवे, याची काळजी घ्या.
5 / 6
मुलांनी या वयात भरपूर व्यायाम केला पाहिजे. रोज १ तास त्यांनी रनिंग, सायकलिंग, स्विमिंग किंवा कोणता ना कोणता मैदानी खेळ खेळला पाहिजे.
6 / 6
या वयातल्या मुलांनी ८ ते १० तास रात्रीची झोप घ्यायलाच हवी. झोपेच्या काळात त्यांच्या शरीराची खूप जलद रिकव्हरी होते आणि ग्रोथ हार्मोनही कार्यरत होत असतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणे खूप गरजेचे आहे.
टॅग्स : पालकत्वलहान मुलंअन्नव्यायाम