मुलं रात्री लवकर झोपतच नाहीत- मध्यरात्रीपर्यंत जागतात? ३ उपाय- शहाणी होऊन चटकन झोपी जातील...
Updated:June 14, 2025 19:34 IST2025-06-14T19:27:37+5:302025-06-14T19:34:12+5:30

बऱ्याच पालकांचा हा अनुभव आहे की मुलं रात्री अजिबात लवकर झोपत नाहीत. पालक बिचारे थकलेले असतात. त्यांना चटकन झोपावं वाटतं. पण मुलांचा धिंगाण काही संपत नाही.
विनाकारण रात्री जागत बसणाऱ्या अशा मुलांना चटकन कसं झोपी लावावं, यासाठी या काही टिप्स पाहा. मुलांना लवकर झोप येईल. आणि तुम्हाला त्रास न देता ते चटकन झोपी जातील..
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांना सकाळी खूप जास्त वेळ अंथरुणात लोळत पडू देऊ नका. ७- ७: ३० किंवा फार तर ८ वाजेपर्यंत त्यांना झोपेतून उठवाच.. सकाळी झोपेतून उठण्याची वेळ निश्चित झाली की पुढच्या बऱ्याच गोष्टी वेळेवर हाेतात.
काही मुलांना दुपारी खूप जास्त वेळ झोपण्याची सवय असते. अशी सवय तुमच्याही मुलांना असेल तर ती मोडा. कारण दुपारी जास्तवेळ झोपल्याने रात्री लवकर झोप येत नाही. दुपारी मुलांना अगदी एखादा तासच झोपू द्या.
मुलांना संध्याकाळच्या वेळी घराबाहेर घेऊन जा. वॉकिंग, रनिंग, सायकलिंग असा जो व्यायाम आवडेल तो त्यांना करून द्या. बॅडमिंटन, टेनिस असा खेळ खेळला तरी चालेल. यामुळे ते थकतात आणि लवकर झोपतात.
रात्री झोपताना खोलीत गडद अंधार करा आणि खोलीत रामरक्षा किंवा मन शांत करणारं एखादं स्त्रोत्र, संगीत लावा. अशा प्रकारचे म्युझिक ऑनलाईन मिळतात. झोपण्याच्यावेळी ते खोलीत लावा आणि मुलांना शांत पडून ऐकायला सांगा. त्यांना लवकर झोप येईल.