1 / 11मुलं वारंवार घरची पोळी - भाजी किंवा इतर पौष्टिक अन्नपदार्थ खायचे सोडून जंकफूड (10 Tips To Keep Your Kids Away From Junk Food ) मागतात, अशी अनेक आई - वडिलांची तक्रार असते. अशावेळी नेमकं करायचं काय या विचाराने ( How to stop children from eating junk food) पालक गोंधळून गेलेले असतात. मुलांची जंकफूड खाण्याची सवय (Healthy Eating Habits For Kids) सोडवण्यासाठी आई वडिलांनी करावेत असे काही सोपे उपाय पाहूयात. 2 / 11१. घरात चिप्स, बिस्किटे, चॉकलेट असले पदार्थ लहान मुलांच्या लगेच हाताला लागतील असे हातासरशी ठेवू नयेत. 3 / 11२. मुलांच्या हाताला लागतील लगेच घेता येतील असे पदार्थ जसे की, चिक्की, मखाणे, ड्रायफ्रुटस, फळे जवळपास ठेवावीत. 4 / 11३. योग्य वेळी जेवण मिळाल्यास मुलांना वारंवार जंक फूड खाण्याची गरज वाटणार नाही. मुलांना जेवणाच्या वेळी जेवण आणि स्नॅक्स टाईमच्या वेळी स्नॅक्स खायला शिकवा. 5 / 11४. घरात केले जाणारे पदार्थच आकर्षक बनवा. रंगीबेरंगी फळे, भाज्या, आणि पोषणयुक्त पदार्थांपासून चविष्ट आणि रंगीबेरंगी पदार्थ तयार करा.6 / 11५. जंक फूड घरी आणू नका. घरीच पौष्टिक पदार्थ बनवा, त्यामुळे मुलांना सहज आरोग्यदायी पर्याय मिळतील आणि ते जंक फूड खाण सोडून देतील. 7 / 11६. घरच्याघरीच मुलांना चमचमीत पण पौष्टिक पदार्थ खायला द्या. जसे की घरचे पिठले, पनीर टिक्का, मखाणा भेल, भिजवलेली चणे-मटकी चाट, भाज्यांचा उत्तप्पा.8 / 11७. जाहिरातींमध्ये दाखवलेले जंक फूड आकर्षक वाटते, त्यापेक्षा मुलांना आरोग्यदायी पदार्थांची महत्त्वाची माहिती द्या.9 / 11८. जंक फूडमुळे होणारे नुकसान आणि आरोग्यदायी अन्नाचे फायदे सोप्या भाषेत मुलांना समजवा.10 / 11९. मुलांसाठी तुम्ही स्वतः आधी रोल मॉडेल बना. तुम्ही स्वतः हेल्दी खाल्लं तरच मुलं ते आत्मसात करतील.11 / 11१०. मुलांना स्वयंपाकात सहभागी करा. मुलांना हेल्दी पदार्थ बनवताना मदत करू द्या, त्यांना ते अधिक आवडेल व स्वतः बनवलेले हेल्दी पदार्थ खाण्याची सवय लागेल.