Join us
Daily Top 2 Weekly Top 5

'या' ८ ठिकाणी चुकूनही तोंड उघडू नका; कधी-कुठे बोलणं टाळायचं, सोपे नियम लक्षात घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 18:24 IST

1 / 9
आयुष्यात संवाद जितका महत्वाचा असतो तितकेच मौन पाळणेही (When Not To Talk) महत्वाचे असते. तोंड कधी आणि कुठे बंद ठेवावं यासाठी काही महत्वाचे नियम आहे. (8 Ways To Decide Whether Silence Is Best)
2 / 9
जेव्हा तुम्हाला खूप राग येतो तेव्हा शब्द आवरणं खूपच गरजेचं असतं. कारण रागात उच्चारलेले शब्द नंतर पश्चात्तापाला कारणीभूत ठरतात. (How To Decide Whether Silence Is Best)
3 / 9
ज्या विषयाबद्दल तुम्हाला पूर्ण ज्ञान नाही तिथे मौन पाळणं शहाणपणाचं ठरेल.
4 / 9
जिथे दुसऱ्यांची उणीदुणी काढली जात असतील किंवा कोणाचा अपमान होत असेल तिथे सहभागी न होता शांत राहणंच योग्य ठरतं.
5 / 9
जेव्हा दोन व्यक्ती गंभीर विषयावर चर्चा करत असतील तेव्हा विनाकारणमध्ये तोंड घालू नये.
6 / 9
तुमचे सत्य जर कोणाला विनाकारण मानसिक त्रास देणार असेल तर अशावेळी शांत राहणं हे माणुसकीचे लक्षण आहे.
7 / 9
स्वत:ची स्तुती होत असताना अतिशयोक्ती करण्यापेक्षा शांत राहून नम्रता जपलेली कधीही चांगली.
8 / 9
जिथे शब्दांनी वाद मिटण्याऐवजी वाढणार आहे अशा ठिकाणी शांत राहून विषय संपवणे हिताचे ठरते.
9 / 9
कोणाचेही गुपित किंवा विश्वासातील गोष्ट सांगताना जिभेवर ताबा असणं अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात शब्दांचा वापर विचारपूर्वक केल्यास नाती आणि स्वत:चा आदर दोन्ही टिकून राहतात.
टॅग्स : मानसिक आरोग्य