By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 20:31 IST
1 / 8आपल्या भावना मोकळेपणानं व्यक्ती न करतात त्या दाबून ठेवल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. (What Are The Effects Of Suppressing Feelings)2 / 8भावना मनात साठवून ठेवल्यामुळे मानसिक दडपण येतं. ज्यामुळे सतत अस्वस्थता वाटते आणि चिडचिड होते.3 / 8दीर्घकाळ भावना दाबून ठेवल्यामुळे डोकेदुखी, उच्च रक्तदाब, पचनाचे विकार आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.4 / 8मनात राग किंवा दु:ख साठवून ठेवल्यानं प्रिय व्यक्तीशी असलेल्या संवादात अडथळा येतो आणि नात्यात कटुता निर्माण होते.5 / 8मनात विचारांचे चक्र सतत सुरू राहिल्यानं निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते.6 / 8भावना मनात दाबून ठेवलेल्या भावनांचा स्फोट होऊन व्यक्ती नैराश्यात जाऊ शकते किंवा तिला अचानक भिती वाटण्याचे दौरे येऊ शकतात.7 / 8स्वत:च्या भावनांना महत्व न दिल्यामुळे हळूहळू आत्मविश्वास कमी होतो आणि नकारात्मकता वाढते.8 / 8मनात भावना दाबून ठेवल्यामुळे व्यक्तीला जीवनात रस उरत नाही. एकटेपणा जाणवतो आणि कशातही स्वारस्य वाटत नाही. कोणी आपल्या न बोलता समजून घेईल का अशी त्यांची अपेक्षा असते.