By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 13:22 IST
1 / 9 रागीट व्यक्तीच्या वर्तनाकडे आपण ओरडणं किवा भांडणं म्हणून पाहतो पण रागीट स्वभावाच्या व्यक्तीमध्ये काही सुक्ष्म आणि वेगळे गुणधर्म असतात. (8 Psychological red Flags Of Chronic Anger)2 / 9रागीट व्यक्ती अनेकदा स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल खूप जास्त अपेक्षा ठेवतात. जेव्हा वास्तव या अपेक्षांशी जुळत नाही तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो आणि राग येतो. (Inside The Mind Of An Angry Person)3 / 9परिस्थिती आणि माणसं आपल्या सांगण्यांनुसारच चालली पाहिजेत असा अट्टहास असणं.4 / 9कोणत्याही विषयाचा मधला मार्ग न काढता एकतर पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट असा विचार करणं5 / 9मनातली भिती किंवा दु:ख दाखवण्याऐवजी रागाचा मुखवटा घालून स्वत:चा बचाव करणं.6 / 9परिणामांचा विचार न करता भावनेच्या भरात तात्काळ आणि तीव्र प्रतिक्रिया देणं.7 / 9इतरांच्या साध्या बोलण्याचा किंवा विनोदाचाही अपमान झाला आहे असा चुकीचा अर्थ काढणं.8 / 9 आपल्यासोबत नेहमीच काहीतरी चुकीचे किंवा अन्यायकारक घडत आहे असं सतत वाटत राहणं.9 / 9रागामुळे शरीर सतत तणावाखाली असणे आणि स्नायूंमध्ये कडकपणा जाणवणे अशी लक्षणं जास्त रागावणाऱ्या व्यक्तीमध्ये दिसून येतात.