By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 08:56 IST
1 / 8प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन याने त्याच्या सोशल मीडियावरून जीवनात यश आणि शांतता मिळवण्यासाठी घरातील कोणत्या 4 सवयी काढून टाकल्या पाहिजे याबाबत सांगितले आहे. (If You Want Success And Peace In life Actor R Madhvan Advises Remove 4 Daily Habits From Your Home)2 / 8आर. माधवन हा केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही तर त्याच्या वैचारीक प्रगल्भतेसाठीही ओळखला जातो. अलिकडेच त्यानं एक व्हिडिओ शेअर केला आहे. 3 / 8जर तुम्हाला जीवनात प्रगती आणि मन:शांती हवी असेल तर घरातून खालील ४ गोष्टी किंवा सवयी हद्दपार केल्या पाहिजेत.4 / 8माधवनच्या मते. ज्या घरात सतत भांडणं आणि नकाराकात्मक वाद होत असतात. त्या घराची प्रगती खुंटते. वारंवार होणाऱ्या मतभेदांमुळे घरातील शांतता भंग होते.5 / 8दुसरी महत्वाची गोष्टी म्हणजे सतत तक्रार करणं अनेकदा आपण आपल्याकडे काय नाही यावर लक्ष केंद्रीत करतो. सततच्या तक्रारींमुळे मनात कमतरतेची भावना निर्माण होते.6 / 8अनेकांना मोठी स्वप्न बघायला आवडत पण त्यासाठी लागणारी मेहनत करण्याची तयारी नसेत. आळस हा यशाच सर्वात मोठा शत्रू आहे. आळसामुळे प्रगतीचा वेग मंदावतो.7 / 8घरातील पसारा हा केवळ भौतिक नसून तो तुमच्या मनातील गोंधळाचे प्रतिबिंब असतो. अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तूंमुळे कामात लक्ष लागत नाही ताण वाढतो. 8 / 8यश आणि शांतता ही केवळ नशिबानं मिळत नाही तर आपल्या दैनंदिन सवयींमधून निर्माण होते.