Join us

सतत चिडचिड-छातीत धडधड-सतत वाटतं उदास? रामदेव बाबा सांगतात ३ उपाय- मन शांत होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2025 19:02 IST

1 / 6
डिप्रेशन येणं, एन्झायटीचा त्रास होणं असे मानसिक त्रास आता खूप वाढत चालले आहेत.
2 / 6
कोणत्याही लहानसहान गोष्टींचा प्रचंड त्रास होतो, मनात सतत तेच ते विचार फिरू लागतात आणि मग प्रचंड निगेटीव्ह वाटून डिप्रेशन येऊ लागतं.
3 / 6
वारंवार असं होणं आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अजिबातच चांगलं नाही. म्हणूनच डिप्रेशन, एन्झायटी असे त्रास कमी करण्यासाठी रामदेव बाबा सांगतात ते काही उपाय करून पाहा..
4 / 6
पहिला उपाय म्हणजे नियमितपणे अनुलोम विलोम प्राणायाम करणे. यासाठी एका शांत जागी बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करून सुरुवातीला ५ मिनिटांसाठी तरी अनुलोम विलोम करा. हळूहळू वेळ वाढवत न्या. मन शांत होईल.
5 / 6
दुसरा उपाय म्हणजे भ्रस्त्रिका प्राणायाम. यामुळे शरीरातले ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि डिप्रेशन, एन्झायटी कमी होण्यास मदत होते.
6 / 6
तिसरा उपाय म्हणजे कपालभाती प्राणायाम. सकाळी उपाशीपोटी १० ते १५ मिनिटांसाठी हे प्राणायाम करा. हळूहळू वेळ वाढवत न्या. मनातली नकारात्मकता, गोंधळ कमी होण्यास मदत होईल.
टॅग्स : मानसिक आरोग्ययोगासने प्रकार व फायदेहोम रेमेडी