By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:03 IST
1 / 10सकाळी उठल्यावर मोबाईल पाहण्याऐवजी १० ते १५ मिनिटं शांत बसा. प्राणायम किंवा ध्यान केल्यानं दिवस चांगला जाईल. (10 Tips For Keep Mind Calm And Positive)2 / 10अनेकदा आपण भूतकाळातील दु:ख किंवा भविष्याची चिंता करतो पण जे होऊन गेलं ते बदलता येत नाही. (How To Keep Mind Calm)3 / 10 प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक व्यक्तीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या क्षमते बाहेरच्या कामांना नाही म्हणायला शिका.4 / 10सतत इतरांचे आयुष्य सोशल मीडियावर पाहिल्यानं स्वत:ची तुलना आणि असंतोष निर्माण होतो.त्यामुळे दिवसाला काहीवेळ डिजिटल डिटॉक्ससाठी राखून ठेवा.5 / 10शरीर थकलेलं असेल तर मन कधीच शांत राहू शकत नाही. रोज किमान ७ ते ८ तास शांत झोप घ्या. सात्विक आहार घ्या.6 / 10मन दुसरीकडे वळवण्यासाठी आवडीचं पुस्तक वाचणं, गाणी ऐकणं किंवा एखादा छंद जोपासणं हा उत्तम उपाय आहे.7 / 10इतरांकडून अपेक्षा कमी ठेवा. लोक आपल्याशी कसं वागतील हे आपल्या हाताता नसतं. पण त्यांच्या वागण्यावर आपण कशी प्रतिक्रिया द्यायची हे आपल्या हातात असतं.8 / 10दिवसभरातून थोडा वेळ काढून बागेत फिरायला जा. निसर्गाशी जोडले गेल्यावर मनाचा ताण आपोआप कमी होतो.9 / 10कोणाबद्दल राग किंवा द्वेष मनात ठेवून कोणाचं काहीही बिघडत नाही पण आपलं मन अशांत राहतं म्हणून माफ करायला शिका.10 / 10तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत. त्याबद्दल ईश्वराचे आभार माना.. आपल्याकडे काय नाहीये याचा विचार कराल तर कायम चिंतेतच राहाल.