नावापुरते मित्र, कामाच्या वेळी गायब असे तर तुमचे मित्रमैत्रिणी नाहीत? ही घ्या टेस्ट-ओळखा
Updated:February 9, 2025 13:47 IST2025-02-09T13:29:55+5:302025-02-09T13:47:09+5:30
how to figure out if you are in a toxic friendship ? see if.. : तुमचे मित्र खरचं तुमचे मित्र आहेत का? की फक्त नावाचेच.

मैत्रीचे नाते फारच महत्त्वाचे असते. अशा गोष्टी असतात ज्या घरच्यांशी बोलू शकत नाही. अगदी प्रियकराशी ही बोलू शकत नाही. पण मित्र परिवाराला सांगू शकतो.
हे नातं फारच महत्त्वाचं आहे. पण आपण आपल्या दोस्तांना जेवढं महत्त्व देतो, तेवढं ते आपल्याला देतात का?
जर तुमचे मित्र तुम्हाला गृहीत धरत असतील तर, ते तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगले नाही. अशा मित्रांची लक्षणे जाणून घ्या.
तुमच्या आयुष्यात काय चालले आहे, यात त्यांना रस नाही. तुम्हाला ते महत्त्व देत नाहीत.
तुमच्या कोणत्याच कष्टांचे त्यांना कौतुक नसते. कधीच तुमचे वागणे त्यांना खास वाटत नाही. तुमच्या छोट्या-मोठ्या यशामध्ये त्यांना आनंद वाटत नाही.
तुम्ही त्यांच्या प्रत्येक दु:खात त्यांच्याबरोबर असता. पण तुम्हाला गरज असताना ते कधीच नसतात. त्यांच्यावर कधीच निर्भर राहता येत नाही.
तुम्ही मित्रांशी भांडलात किंवा कधी काही प्रसंग घडल्यानंतर, ते तुमच्याबद्दल विचार करत नाहीत. तुमची मैत्री तुटण्याबाबत त्यांना फारक पडत नाही.
तुमच्यासाठी मित्रांकडे कधीच वेळ नसतो. कधीही भेटायला, बोलायला ते नाहीच म्हणतात. काही ना काही कारणं देतात.
तुम्ही कोणत्याही गोष्टीला नकार देत नाही. तसे करायला घाबरता. कारण त्यांना तुमचं पटणारच नाही, याची तुम्हाला खात्री असते. तुमच्या मताला काहीच किंमत मित्र देत नाहीत.
असे मैत्रीचे नाते तुमच्यासाठी चांगले नाही. त्यांच्याशी संवाद साधा. तरी त्यांच्या वागण्यात बदल न झाल्यास त्या मैत्रीच्या नात्याला राहण्याला काही अर्थ नाही.