Join us

दिवसभरातील ५ सवयी नकळत वाढवतात तुमचा स्ट्रेस! आरोग्याचं वाटोळं होण्यापूर्वी करा ‘एवढाच’ बदल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2025 17:41 IST

1 / 7
आपल्याला अनेकदा असे वाटते की, स्ट्रेस हा फक्त एखाद्या मोठ्या घटनेनंतरच येतो, पण सत्य परिस्थिती अशी आहे की आपल्या डेली रुटीनमधील नेहमीच्या सवयी देखील ( daily habits raising stress levels) हळूहळू आपली स्ट्रेस लेव्हल वाढवत राहतात आणि याची आपल्याला जाणीवही होत नाही. या सवयी वेळीच ओळखणे आणि त्या बदलणे खूप गरजेचे असते, कारण सतत टिकून राहणारा स्ट्रेस हा शरीर आणि मन या दोन्हीसाठी हानिकारक असतो.
2 / 7
याबद्दल, यशोदा हॉस्पिटल्सच्या कन्सल्टंट सायकॉलॉजिस्ट डॉ. प्रग्या रश्मी यांनी आपल्या दिवसभरातील काही अशा कॉमन (habits that increase stress) सवयी सांगितल्या आहेत, ज्या अगदी नकळतपणे आपल्यावरील स्ट्रेस वाढवतात. आपण अशा ५ वाईट सवयींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या नकळतपणे तुमचा स्ट्रेस वाढवू शकतात.
3 / 7
सतत मोबाईल किंवा सोशल मिडिया बघत राहणे हे स्ट्रेस येण्याचे एक मोठे कारण आहे. वारंवार येणारे नोटिफिकेशन, ईमेल किंवा बातम्यांचे अपडेट्स पाहिल्यामुळे मेंदू कायम अलर्ट किंवा अ‍ॅक्टिव्ह राहतो आणि त्याला विश्रांती मिळत नाही. डॉ. प्रग्या रश्मी सांगतात की, यामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढते, ज्यामुळे थकवा आणि चिडचिडेपणा येतो. जर तुम्ही दिवसातील ठरलेल्या वेळीच मोबाईल पाहिला आणि डिजिटल डिटॉक्स केले, तर तणावाचे प्रमाण खूप कमी करता येऊ शकते.
4 / 7
झोपेची कमतरता किंवा झोपेच्या वाईट सवयी देखील स्ट्रेस वाढवतात. रात्री उशिरापर्यंत जागे राहणे किंवा झोपेची योग्य वेळ निश्चित न करणे यामुळे शरीराचा सर्केडियन रिदम बिघडतो. परिणामी, मूड खराब होतो आणि चिंता वाढते. दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावल्यास मानसिक शांतता मिळण्यास मदत होते.
5 / 7
प्रत्येक कामासाठी 'हो' म्हणणे ही देखील स्ट्रेस वाढवणारी एक सवय आहे. जास्त जबाबदाऱ्या घेतल्यामुळे स्वतःसाठी वेळ शिल्लक राहत नाही, ज्यामुळे मेंदू थकलेला आणि अस्वस्थ, बेचैन वाटू लागतो. त्यामुळे कामाच्या मर्यादा निश्चित करणे, विश्रांतीसाठी वेळ काढणे आणि 'नाही' म्हणायला शिकणे आवश्यक आहे.
6 / 7
शारीरिक हालचालींची कमतरता असणे हे देखील स्ट्रेस वाढण्याचे एक मुख्य कारण आहे. डॉ. प्रग्या रश्मी यांनी सांगितले की, जेव्हा आपण कमी चालतो-फिरतो किंवा हालचाल कमी करतो तेव्हा शरीरात एंडोर्फिन कमी प्रमाणात तयार होतात, ज्यामुळे आपला मूड खराब होतो. रोज थोडे मॉर्निंग वॉक, योग किंवा व्यायाम केल्याने मन हलके राहते आणि स्ट्रेस कमी होतो.
7 / 7
चुकीचा आहार देखील स्ट्रेस वाढवतो. खूप जास्त साखर, सतत चहा, कॉफी पिणे किंवा जेवण वगळणे अशा सवयी रक्तातील साखर असंतुलित करतात आणि मज्जासंस्थेला उत्तेजित करतात, यामुळे स्ट्रेस लेव्हल वाढते.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स