चला आता टाळा, अभ्यासाचा कंटाळा.. अभ्यास करावासाच वाटत नाही?.. पाहा काय करायला हवं
Updated:February 23, 2025 19:39 IST2025-02-23T19:20:57+5:302025-02-23T19:39:19+5:30
Come on, avoid the boredom of studying.. Don't you feel like studying?.. See what you should do : अभ्यास करताना फारच कंटाळा येतो ? मग हे उपाय करा.

अभ्यासाला बसलं की जांभाई आलीच म्हणून समजा. अभ्यास म्हटलं की, प्रचंड आळस येतो.
पण काही साध्या सोप्या उपायांचा वापर करून हा आळस घालवता येतो. असे उपाय जाणून घ्या.
अति अभ्यास करण्याचे ध्येय ठेवूच नका. लहान - लहान धडे वाचा. एखादाच प्रश्न करीन असं ठरवून अभ्यासाला बसा. डोक्याला ताण येईल असे काही ठरवू नका.
एक वेळापत्रक तयार करून घ्या. त्यानुसारच सगळी कामं करा. एकदा का शरीराला त्याची सवय लागली की, ते आपोआप पाळले जाते.
मोबाइल फोनचे नोटीफीकेश बंद करून ठेवा. मन विचलीत करणारं काहीच जवळपास ठेवू नका.
एकदाच मोठं काही करायला जाऊ नका. मोठा धडा असेल तर त्याचे भाग करून घ्या. त्यानुसार अभ्यास करा.
आवडीच्या विषयाने सुरवात करा. मग नावडते विषय करायला घ्या. एकदा का सवय झाली की मग कंटाळा येणार नाही.
एखादी संकल्पना समजून घेताना, आजूबाजूची उदाहरणे वापरा. त्यामुळे ते लक्षात ठेवणं सोपं जातं. मजेशीरही वाटतं.
एका दिवसात किती अभ्यास करणार ते ठरवून घ्या. आवडीच्या कृतीही करा मन शांत राहील.
सतत पुस्तक उघडून बसू नका. आरामही करा. ब्रेक घ्या. फ्रेश व्हा मग पुन्हा अभ्यासाला लागा.
बाहेर जाऊन एक फेरफटका मारून या. डोकं आणि मन दोन्ही फ्रेश होते.