Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लोक तुमच्यावर जळत असतील तर कसं ओळखाल? ८ लक्षणांवरून ओळखा जळके लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 19:30 IST

1 / 8
आपल्या प्रगतीवर किंवा सुखावर जळणारे लोक अनेकदा समोरून खूप चांगले वागतात पण त्यांच्या वागण्यातील काही सूक्ष्म बदल त्यांना ओळखायला मदत करतात. अशा लोकांना ओळखण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या. (8 Warning Signs That Someone Is Secretly Jealous Of You)
2 / 8
जळणारे लोक तुमच्या तोंडावर खूप गोड बोलतात आणि अतिशयोक्तीपूर्ण कौतुक करतात पण तुम्ही तिथून गेल्यावर लगेच तुमच्याबद्दल नकारात्मक बोलू लागतात. (How Do You Know If People Are Jealous Of You)
3 / 8
तुम्ही घेतलेल्या कष्टांचे कौतुक करण्याऐवजी तुझं नशीब चांगलं होतं म्हणून झालं किंवा कोणाचीतरी मदत मिळाली असेल असं म्हणून तुमच्या मेहनतीला कमी लेखतात.
4 / 8
जळणारे लोक मनातून तुमचा हेवा करतात. त्यामुळे ते बोलण्याची पद्धत, कपडे किंवा काम करण्याची शैली चोरून तुमची बरोबर करण्याचा प्रयत्न करतात.
5 / 8
तुमच्या चांगल्या कामांबद्दल हे लोक गप्प राहतील पण तुमच्याकडून एखादी छोटी चूक झाली की सर्वांसमोर सांगायला किंवा त्याचे भांडवल करायला त्यांना आनंद होतो.
6 / 8
जेव्हा तुम्ही एखादी आनंदाची बातमी सांगता तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडतो.
7 / 8
ते नेहमी स्वत:ची किंवा इतरांची तुलना करतात. तुम्ही काही विकत घेतलं किंवा काही साध्य केलं की लगेच माझ्याकडे यापेक्षा जास्त चांगलं आहे किंवा त्याचं यापेक्षा उत्तम आहे. असं म्हणत तुमच्या आनंदावर विरजण घालतात.
8 / 8
तुमच्यावर जळणारे लोक तुम्हाला कधीही प्रगतीचा मार्ग दाखवत नाहीत. अनेकदा ते तुम्हाला जाणीवपूर्ण असा सल्ला देतात ज्यामुळे तुमचं नुकसान होईल.
टॅग्स : मानसिक आरोग्य