By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 17:58 IST
1 / 7आयुष्यात शांतता आणि समाधान टिकवून ठेवण्यासाठी रागावर कंट्रोल असणं फार महत्वाचे आहे. विशेषत: ६ प्रसंगी न रागवणंच चांगलं. (6 Places Where You Should Never Get Angry)2 / 7अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते. रागात जेवल्यानं त्याचा आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो आणि अन्नाचा अपमान होतो. आनंद मनानं जेवल्यास ते शरीराला नीट लागते.3 / 7 झोपण्यापूर्वी मनात राग किंवा द्वेष असेल तर शांत झोप लागत नाही. याचा परिणाम दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्षमतेवर आणि मानसिक आरोग्यावर होतो.4 / 7आपल्यापेक्षा मोठे असलेले व्यक्ती आणि शिक्षक आपल्याला कधीतरी रागवतात किंवा एखादी गोष्ट पटवून देतात. अशावेळी उलटं न बोलता किंवा राग न करता त्यांचं ऐकून घ्यावं5 / 7रस्त्यावर, बसमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी किरकोळ कारणांवरून राग केल्यानं तुमची प्रतिमा मलीन होते. तिथं वाद घातल्यानं वेळ आणि शक्ती वाया जाते. ज्याचा काही सकारात्मक परिणाम होत नाही.6 / 7मुलं निरागस असतात. त्यांच्या चुकांवर ओरडण्याऐवजी किंवा रागवण्याऐवजी त्यांना प्रेमानं समजावून सांगितले तर जास्त लवकर शिकतील. सततच्या रागावण्यामुळे मुलांच्या मनात भिती किंवा बंडखोर वृतती निर्माण होते.7 / 7कधीकधी आपली चूक असूनही आपण ती मान्य करण्याऐवजी समोरच्यावर राग काढतो. अशावेळी राग करण्याऐक्षा आपली चूक मान्य करून ती सुधारा हेच शहाणपणाचं ठरेल.